Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून रशियाने मानलेत भारताचे आभार.. पहा, जागतिक राजकारणात भारताने केले तरी काय..?

दिल्ली : युक्रेनच्या मुद्द्यावर अमेरिकेचे कोणतेही दडपण भारताने घेतले नाही. तसेच या मुद्द्यावर बैठक सुरू ठेवावी किंवा नाही यासाठी आयोजित मतदान प्रक्रियेत भागही घेतला नाही. भारताने या प्रकरणी जे धोरण घेतले त्याचे रशियाने कौतुक केले तसेच भारताचे आभारही मानले आहेत. युक्रेन सीमेवर “तणावग्रस्त परिस्थिती” वर चर्चा करण्यासाठी बैठकीपूर्वी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) मध्ये भारताने प्रक्रियात्मक मतदानात भाग घेतला नाही.

Advertisement

संयुक्त राष्ट्रातील रशियाचे प्रथम उप-स्थायी प्रतिनिधी दिमित्री पोलिंस्की यांनी सोमवारी ट्विटरवर संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत यांच्या ट्विटला उत्तर देताना लिहिले की, ही अमेरिकन मुत्सद्देगिरीची सर्वात वाईट पातळी आहे. आमच्या चार मित्र राष्ट्रांचे, चीन, भारत, गॅबॉन आणि केनियाचे आभार, ज्यांनी मतदानापूर्वी अमेरिकेच्या दबावाला आजिबात जुमानले नाही.

Advertisement

रशियन आक्रमकता केवळ युक्रेन आणि युरोपसाठीच नाही तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेलाही धोका आहे. त्याला उत्तरदायी बनवण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आहे. जर आधीच्या साम्राज्यांना बळजबरीने त्यांच्या प्रदेशांवर पुन्हा दावा करण्यास सुरुवात करण्याचा परवाना दिला गेला तर जगासाठी याचा काय अर्थ होईल? हे आपल्याला धोकादायक मार्गावर नेईल, असे अमेरिकेचे राजदूत ग्रीनफील्ड यांनी याआधी म्हटले होते.

Advertisement

बैठकीआधी, रशियाने, जो परिषदेचा स्थायी आणि व्हेटो-सक्षम सदस्य आहे. बैठक पुढे सुरू ठेवावी की नाही हे निर्धारित करण्यासाठी प्रक्रियात्मक मतदानाची मागणी केली होती. अमेरिकेच्या विनंतीवरून होणाऱ्या बैठकीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला नऊ मतांची आवश्यकता होती. रशिया आणि चीनने बैठकीच्या विरोधात मतदान केले, तर भारत, गॅबॉन आणि केनियाने यामध्ये भाग घेतला नाही. फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनसह इतर दहा कौन्सिल सदस्यांनी बैठक सुरू ठेवण्यासाठी मतदान केले. बैठकीत, भारताने अधोरेखित केले की “शांत आणि रचनात्मक” मुत्सद्देगिरी ही “काळाची गरज” आहे आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेच्या व्यापक हितासाठी सर्व बाजूंनी तणावात वाढ करणारे कोणतीही निर्णय टाळले पाहिजेत.

Loading...
Advertisement

युक्रेनच्या सीमेजवळ हजारो रशियन सैन्य जमा झाल्यामुळे युक्रेनच्या संकटावर चर्चा करण्यासाठी 15 सदस्यीय कौन्सिलची बैठक झाली. या कारवाईमुळे युक्रेनवर आक्रमण होण्याची भीती वाढली आहे. रशियाने या आक्रमणाची योजना असल्याचा इन्कार केला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी परिषदेला सांगितले की, भारत युक्रेनशी संबंधित घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Advertisement

तिरुमूर्ती म्हणाले, की “सर्व देशांचे कायदेशीर सुरक्षेचे हित लक्षात घेऊन, तत्काळ तणाव निवळू शकेल आणि या प्रदेशात आणि त्याही पलीकडे दीर्घकालीन शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने उपाय शोधण्यात भारताचे हित आहे.” तिरुमूर्ती म्हणाले, की 20,000 हून अधिक भारतीय विद्यार्थी आणि नागरिक युक्रेनच्या सीमावर्ती भागांसह त्या देशाच्या विविध भागांमध्ये शिक्षण घेत आहेत आणि राहतात. ते म्हणाले, की या नागरिकांच्या सुरक्षिततेला आमचे प्राधान्य आहे.

Advertisement

रशिया काही माघार घेईना..! अमेरिका आणि ब्रिटेनने सुरू केलाय नवा प्लान; पहा, कुणाचे होणार जास्त नुकसान..?

Advertisement

… म्हणून चक्क तालिबानने मानलेत भारताचे आभार; पहा, भारताने नेमके केले तरी काय..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply