Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशिया काही माघार घेईना..! अमेरिका आणि ब्रिटेनने सुरू केलाय नवा प्लान; पहा, कुणाचे होणार जास्त नुकसान..?

दिल्ली : युक्रेनच्या प्रकरणात रशियाचा वाढता आक्रमकपणा पाहता रशियावर निर्बंध टाकण्याचा विचार अमेरिका आणि युरोपिय देशांनी सुरू केला आहे. या देशांनी तर आता प्रत्यक्षात तयारीही केली आहे. विरोधी रिपब्लिकन खासदारांनी सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांसोबत अमेरिकेत रशियावर निर्बंध आणण्यासाठी विधेयक तयार केले आहे. या आठवड्यात हे विधेयक तयार होण्याची शक्यता आहे. ब्रिटननेही अशीच पावले उचलण्याचे सांगितले आहे. याबरोबरच रशियाकडूनही अशाच प्रकारचे प्रत्युत्तर मिळण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

यूएस सिनेटच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे प्रमुख असलेले डेमोक्रॅट खासदारांनी सांगितले, की जर युद्ध झाले तर ते रशियाच्या विरोधात आणि युक्रेनच्या समर्थनार्थ अमेरिकन संसदेने केलेली सर्वात कठोर कारवाई असेल. ब्रिटननेही रशियावर निर्बंध घालण्याची तयारी सुरू केली आहे. रशियातील प्रमुख नेते, अधिकारी आणि कंपन्यांवर बंदी टाकण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबतचा मसुदा संसदेत मांडण्यासाठी तयार करण्यात येत आहे.

Advertisement

ब्रिटनच्या वित्त विभागाचे मुख्य सचिव सायमन क्लार्क यांनी म्हटले आहे, की जर रशियाने युक्रेनवर आक्रमण केले तर आम्ही रशियन कंपन्यांवर निर्बंध टाकू. प्रत्युत्तरात, रशियन राष्ट्राध्यक्षांच्या क्रेमलिन कार्यालयाचे प्रवक्ते, दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, अशा प्रकारच्या निर्बंधांचा ब्रिटनवर अधिक परिणाम होईल, कारण तेथे सर्व मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रशियन गुंतवणूक आहे.

Advertisement

याबरोबरच रशिया ब्रिटनवरील निर्बंधांनाही प्रत्युत्तर देणार आहे. हे उल्लेखनीय आहे की 1991 मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर, रशिया आणि माजी सोव्हिएत देशांतील लोकांनी ब्रिटेनच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे आणि येथील शहरांमध्ये मालमत्ता खरेदी केल्या आहेत. रशियाने 2014 मध्ये क्रिमियाला जोडल्यापासून ब्रिटनने 180 रशियन लोक आणि कंपन्यांवर निर्बंध टाकले आहेत.

Loading...
Advertisement

ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांनी म्हटले आहे, की प्रथम आम्ही मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून युद्ध होऊ नये यासाठी प्रयत्न करू, त्यानंतर आम्ही निर्बंध टाकू. याआधी ट्रस युक्रेन आणि रशियाला भेट देणार असून, दोघांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. संवादातून मतभेद दूर केले पाहिजेत. दरम्यान, नैसर्गिक वायूसाठी युरोप रशियावर अवलंबून राहण्यावर नाटोने चिंता व्यक्त केली आहे. संपूर्ण युरोपला रशिया हा सर्वात मोठा गॅस पुरवठादार आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या काळात रशियाचा गॅस पुरवठा विस्कळीत झाला, तर थंडीच्या वातावरणात युरोपिय देशांची अर्थव्यवस्था संकटात सापडू शकते.

Advertisement

रशियन-युक्रेन सीमेवर वाढलेल्या तणावाच्या मुद्द्यावर कॅनडाने युक्रेनमधील आपल्या सैन्याला डिनिपर नदीच्या काठावर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. हे कॅनेडियन सैनिक युक्रेनच्या सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी गेले आहेत. दरम्यान, कॅनडाने कीवमधील आपल्या दूतावासाला अतिरिक्त कर्मचारी आणि कुटुंबीयांना परत पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

चीन दौऱ्याआधीच पाकिस्तानला बसलाय झटका.. रशियाने केलेय ‘असे’ काही; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply