Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IND vs WI: भारतीय संघाबद्दल अझरुद्दीनने दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाला..

मुंबई – वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. एकदिवसीय संघात कुलदीप यादव आणि दीपक हुडा यांचे पुनरागमन झाले आहे, तर प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान या प्रतिभावान क्रिकेटपटूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघाच्या निवडीवर भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने प्रतिक्रिया दिली आहे. अझहरने विशेषत: भारतीय एकदिवसीय संघाबद्दल आपले मत मांडले आणि एका ट्विटमध्ये लिहिले की, ‘या यादीत काही खूप आशादायी खेळाडू आहेत, रोहित शर्माच्या सक्षम नेतृत्वाखाली टीम इंडियाला शुभेच्छा.

Advertisement

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 6 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. वनडे मालिकेतील सर्व सामने अहमदाबादमध्ये खेळवले जाणार आहे. याशिवाय टी-20 मालिकेतील सर्व सामने कोलकातामध्ये होणार आहेत. टी-20 मालिकेतील पहिला सामना 16 फेब्रुवारीला होणार आहे.

Advertisement

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत कुलदीप यादव आणि बिश्नोई यांची निवड करण्यात आली आहे. जुलै 2021 नंतर कुलदीपचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. कुलदीपने शेवटचा वनडे सामना जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. धोनीच्या निवृत्तीनंतर कुलदीपची कामगिरी खूपच सरासरी होती, त्यामुळे त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. दुसरीकडे, रवी बिश्वोईची निवड देखील चाहत्यांसाठी खूप आनंददायी अनुभव आहे. बिश्नोई आयपीएलमध्ये लखनौ सुपरजायंट्स या नवीन फ्रँचायझीसाठी खेळणार आहे.

Loading...
Advertisement

दीपक हुडाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट अष्टपैलू खेळ दाखवला होता, त्यामुळेच त्याची संघात निवड झाली आहे. व्यंकटेश अय्यरच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. हुड्डा यापूर्वी भारताकडून खेळला आहे, मात्र संस्मरणीय कामगिरी न केल्यामुळे तो संघाबाहेर होता. पण आता हुडाच्या पुनरागमनामुळे त्याला आपली कारकीर्द घडवण्याची संधी मिळाली आहे.

Advertisement

एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल , कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद. सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान

Advertisement

T20I संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्य कुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल.

Advertisement
Advertisement

Leave a Reply