असे काय आहे ‘त्या’ विमानात की चीन-अमेरिका घेताहेत शोध..! चीनचा ‘तेथे’ ही आहे खतरनाक प्लान; जाणून घ्या..
दिल्ली : अमेरिकन नौदल आपले सर्वात प्रगत लढाऊ विमान F-35 शोधण्यासाठी सध्या आकाश पाताळ एक करत आहे. हे विमान 24 जानेवारी रोजी दुर्घटनाग्रस्त झाले होते. या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. सीएनएनच्या एका वृत्तात म्हटले आहे की, या विमानावर चीनची नजर असल्याने अमेरिका फायटर जेट शोधण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. चीनला हे तंत्रज्ञान मिळू नये म्हणून अमेरिका क्रॅश झालेल्या जेटचा शोध घेत आहे.
अमेरिकेच्या या तपास मोहिमेवर चीन बारकाईने नजर ठेवत असल्याचेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. चीन अमेरिकेच्या शोध मोहिमेच्या जवळ जाणार नाही हे तज्ज्ञांनी मान्य केले तरी ते लक्ष ठेवून आहेत. अर्थात, त्याला अमेरिकन जेटचे तंत्रज्ञान जाणून घ्यायला आवडेल, पण चीन त्या शोध मोहिमेच्या जवळपास जाणार नाही. असे केल्याने चीन अमेरिकेसोबत सुरू असलेला वाद आणखी वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
मात्र, हा काळ तणावपूर्ण असल्याचेही काही तज्ज्ञांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत चीनने अमेरिकेला मदत करावी. कारण चीनने क्रॅश झालेले जेट किंवा त्याचे स्पेअर पार्ट्स ताब्यात घेतल्यास दोन्ही देशांमधील वाद चिघळतील. चीनच्या सरकारी माध्यमांनी विमान अपघाताबद्दल अमेरिकेवर टीका केली आहे. या अपघातामुळे अमेरिकन सैन्य आता थकले आहे, असे चिनी माध्यमांमध्ये सांगितले जात आहे. आपल्या सैनिकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य आणि उच्च तंत्रज्ञानाच्या जोखमीच्या किंमतीवर अमेरिका चीनविरुद्ध आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करत असल्याचे चीनने म्हटले आहे.
दरम्यान, चीन यामध्ये हस्तक्षेप करणार नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले असले तरी चीनचा काहीच भरवसा नाही. कारण, दुसऱ्या देशांचे तंत्रज्ञानाची कॉपी करण्यात चीनी लोक तरबेज आहेत. याआधीही असे कारनामे चीनने अनेक वेळा केले आहेत. आताही चीन अमेरिकेच्या या शोधमोहिमेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यामुळे कदाचित या दुर्घटनाग्रस्त विमानाचे काही स्पेअर पार्ट चीनला मिळाले तरी चीने ते तसेच अमेरिकेला परत करील, याचीही काहीच शाश्वती नाही. याची जाणीव अमेरिकेलाही आहे. त्यामुळेच तर अमेरिका हे विमान शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे.
.. म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान चाललेत चीनला.. पहा, चीनकडे काय करणार मागण्या..?
.. तर चीनही आहे एकदम तयार..! पहा, आता कोणत्या मुद्द्यावर अमेरिकेला दिलाय गंभीर इशारा..