Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. म्हणून ‘हा’ मित्रदेशच भडकलाय अमेरिकेवर..! केलाय ‘हा’ खळबळजनक आरोप..

दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यातील सुरू असलेल्या तणावाने आता नवे वळण घेतले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर जेलेन्स्की अमेरिकेवर नाराज आहेत. रशियाच्या आक्रमणाची भीती निर्माण करून अमेरिका युक्रेनच्या अर्थव्यवस्थेचे विनाकारण नुकसान करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रशिया युद्ध सुरू करणार नाही असे म्हटले आहे. परंतु, अमेरिका आणि नाटोला इशारा दिला आहे की रशियाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर मात्र कोणतीही तडजोड करणार नाही. तर दुसरीकडे रशिया कधीही या देशावर आक्रमण करेल, असा दावा अमेरिकेने केला आहे.

Advertisement

युक्रेनच्या अध्यक्षांनी शुक्रवारी सांगितले, की लष्करी तैनातीचा अंदाज घेण्यासाठी फक्त उपग्रहाने घेतलेले फोटो कामाचे नाहीत. परिस्थिती आतापर्यंत बिघडलेली नाही. ‘आम्ही आमच्या स्वातंत्र्य आणि प्रादेशिक सार्वभौमत्वासाठी अमेरिकेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभारी आहोत. पण मी युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष आहे. मी येथे आहे आणि मला या सर्व गोष्टींबद्दल अधिक माहिती आहे. मला इतर कोणत्याही देशाच्या राष्ट्राध्यक्षांपेक्षा जास्त माहिती आहे.’ युक्रेनचे राष्ट्राध्यक्षांचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडे होता.

Advertisement

रशियाने युक्रेनच्या सीमेवर एक लाख सैनिक, रणगाडे, क्षेपणास्त्रे आणि इतर अनेक शस्त्रे तैनात केल्याची माहिती आहे. त्यामुळे रशिया युक्रेनवर हमला करून त्यावर कब्जा करेल, अशी भीती वाढली आहे. अमेरिकेच्या इशाऱ्यांनंतरही युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आणि इतर अधिकारी शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेला युद्धाच्या भीतीपासून दूर ठेवू इच्छितात, असेही मानले जाते. या दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पुन्हा एकदा रशिया फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर आक्रमण करण्याची शक्यता व्यक्त केली.

Loading...
Advertisement

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी क्रिमियाकडे इशारा करत म्हटले की, रशियाने 8 वर्षांपूर्वी कब्जा केला होता आणि त्यामुळे तणाव वाढत नाही असे ते म्हणू शकत नाहीत. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह म्हणाले, की रशिया युद्ध सुरू करणार नाही. पण पाश्चिमात्य देशांकडून त्यांचे हितास नुकसान होऊ देणार नाही. लावरोव्ह यांनी एका रशियन रेडिओ स्टेशनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘जोपर्यंत प्रत्येकजण रशियन फेडरेशनवर अवलंबून आहे तोपर्यंत युद्ध होणार नाही, आम्हाला युद्ध नको आहे. पण आम्ही आमच्या हितसंबंधांचाही चुराडा होऊ देणार नाही आणि दुर्लक्ष करू देणार नाही.

Advertisement

अमेरिकेच्या धमक्यांचा ‘इफेक्ट’..! आता रशियाने युक्रेनबाबत केलेय महत्वाचे वक्तव्य; पहा, युद्धाचे संकट टळणार का..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply