Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानही कोरोनाने हैराण..! वर्षभरानंतर देशात प्रथमच घडलेय ‘असे’ काही; जाणून घ्या..

दिल्ली : मागील दोन वर्षांपासून जगात कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अजूनही हा घातक आजार थांबण्याचे नाव घेत नाही. अनेक देश या संकटात सापडले आहेत. या देशांना मोठे नुकसानही सहन करावे लागले आहे. अमेरिका, युरोप आणि आशियाई देशात कोरोनाने थैमान घातले आहे. भारता शेजारील पाकिस्तानलाही कोरोनाने जबर झटका दिला आहे. आधीच प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला हा देश कोरोनाच्या संकटाने हैराण झाला आहे.

Advertisement

पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूची स्थिती वाईट आहे. 2020 मध्ये साथीचा आजार सुरू झाल्यापासून, एकाच दिवसात कोविडची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गेल्या 24 तासांत पाकिस्तानमध्ये तब्बल 8183 लोक कोरोना पॉजिटिव आढळले आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे देशात कोरोना रुग्ण वेगाने वाढत असल्याचे पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Advertisement

पाकिस्तानमध्ये कोविडमुळे मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. मृतांचा आकडाही ६ ऑक्टोबरनंतरचा सर्वाधिक आहे. गेल्या 24 तासात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. ६ ऑक्टोबरला 39 जणांचा मृत्यू झाला होता. कोरोना विषाणूचे ओमिक्रॉन प्रकार पाहता, सरकारने निर्बंधात 15 फेब्रुवारीपर्यंत वाढ केली ​​आहे.

Loading...
Advertisement

आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, गेल्या 24 तासांत 68,624 कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 8,183 लोक कोरोना संक्रमित आढळले आहेत. ओमिक्रॉनच्या वाढीसह, पाकिस्तानमध्ये कोविड पॉजिटिविटी दर 11.92 टक्क्यांवर पोहोचला आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूचे 98,221 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 14,02,070 लोक कोरोना संक्रमित आढळले आहेत. सरकारने कोविड निर्बंधांचे दोन भाग केले आहेत. जेथे पॉजिटिविटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे, तेथे निर्बंधात काही सूट देण्यात आली आहे, परंतु 10 टक्क्यांपेक्षा जास्त पॉजिटिविटी दर असलेल्या ठिकाणी कडक निर्बंध आहेत.

Advertisement

तालिबानमुळे पाकिस्तानसाठी नवे टेन्शन..! ‘तसे’ घडले तर पाकिस्तानचे होईल मोठे नुकसान; जाणून घ्या, नेमके काय घडलेय..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply