अमेरिकेच्या एन्ट्रीने चीनचा तिळपापड..! ‘त्या’ वादाच्या मुद्द्यावर अमेरिकेला दिलेय जोरदार प्रत्युत्तर
नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील सीमा विवादात तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाला चीनने विरोध केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वरिष्ठ कर्नल वू कियान म्हणाले की, बॉर्डर प्रश्न हा भारत आणि चीन यांच्यातील मुद्दा आहे आणि दोन्ही देश तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाला विरोध करतात.
भारत-चीन सीमेवरील तणावाबाबत अमेरिकेच्या वक्तव्यानंतर चीनचा तिळपापड झाला आहे. ड्रॅगन अमेरिकेवर चांगलाच भडकला आहे. कियान म्हणाले, चीन कुणावरही बळजबरी करत नाही किंवा इतरांना सक्ती करू देत नाही. इतर देशांवर जबरदस्ती मुत्सद्देगिरी केल्याबद्दल चीनचा अमेरिकेला कडाडून विरोध आहे. याआधी व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितले होते, की अमेरिका चीन-भारत बॉर्डर वादावर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि शेजारी देशांवर दबाव आणण्याच्या चीनच्या वृत्तीबद्दल काळजीत आहे.
या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये बैठका होत आहेत. संवाद आणि विचारविनिमय करून हा प्रश्न सोडवण्यासाठी चीन काम करेल. या बैठकीत चार करार झाल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही बाजूंनी मान्य केले की दोन्ही देश त्यांच्या नेत्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करतील आणि उर्वरित समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे काम करतील. दुसरे म्हणजे, दोन्ही बाजूंनी या प्रदेशातील जमिनीवर सुरक्षा आणि स्थिरता राखण्यासाठी प्रभावी प्रयत्न करण्याचे मान्य केले आहे.
तिसरे म्हणजे, दोन्ही बाजूंनी लष्करी आणि मुत्सद्दी माध्यमांद्वारे संवाद सुरू ठेवण्यास आणि लवकरात लवकर दोन्ही बाजूंना स्वीकारार्ह तोडगा काढण्याचे मान्य केले आहे. कियान म्हणाले, की चौथा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे कमांडर-स्तरीय बैठकीची पुढची फेरी लवकरात लवकर व्हावी यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आहे.
म्हणून चीन भडकला आणि दुतावासाने दिली ‘ती’ प्रतिक्रिया; पहा नेमके काय चालू आहे जागतिक राजकारणात