Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारत-पाकिस्तान T20 विश्वचषक सामन्याबाबत शोएब अख्तरचे भाकीत, जाणून घ्या काय म्हणाला शोएब…

मुंबई – यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्‍या टी-20 विश्वचषकाबाबत आधीच अटकळ बांधली जात आहे. 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील विश्वचषक सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यातून दोन्ही संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेची सुरुवात करणार आहेत.

Advertisement

याआधी पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने (shoeb akhtar) या सामन्याबाबत भाकीत वर्तवले आहे. पाकिस्तानचा संघ हा सामना जिंकणार असल्याचे त्यांनी सांगितले. तो म्हणाला की आमचा संघ भारताला पुन्हा पराभूत करू शकेल. टी-20 मध्ये पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा सरस आहे. भारतीय मीडियाच आपल्या संघावर विनाकारण दबाव टाकतो. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये दोन देशांत संघर्ष होतो तेव्हा भारताचा पराभव होणे स्वाभाविक आहे.

Loading...
Advertisement

गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. कोणत्याही विश्वचषकात पाकिस्तानकडून भारतीय संघाचा हा पहिला पराभव ठरला होता. सुपर-12 फेरीतील या पराभवानंतर भारताला न्यूझीलंडविरुद्धही पराभवाला सामोरे जावे लागले होते त्यामूळे भारत उपांत्य फेरी गाठू शकला नाही.

Advertisement

1992 ते 2021 या कालावधीत T20 आणि ODI वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान संघ 13 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये भारताने 12 आणि पाकिस्तानने एक सामना जिंकला आहे. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला भेट दिली नाही. त्याच वेळी, नियंत्रण रेषेवर सातत्याने होत असलेले शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर हे नाते आणखी बिघडले. त्यानंतर दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्येच आमनेसामने आले आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply