Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ कारणाने न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेच्या वेळापत्रकामध्ये बदल, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

मुंबई – भारतीय महिला क्रिकेट संघाला (Indian women’s cricket team) एकदिवसीय विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध एक टी-20 आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. यासाठी भारतीय महिला संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाले आहे.

Advertisement

मात्र आता या मालिकेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी आता सर्व सहा सामने ‘क्वीन्सटाऊन’मध्ये एकाच ठिकाणी खेळवले जाणार आहे. ही मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर 11 फेब्रुवारीपासून वनडे मालिका सुरू होईल. यानंतर न्यूझीलंडमध्येच वनडे वर्ल्ड कप होणार आहे.

Advertisement

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला T20 सामना नेपियरच्या मॅक्लीन पार्कवर खेळवला जाणार होता. यानंतर वनडे मालिकेतील पहिला सामनाही येथे होणार होता. त्याचवेळी, दुसरा (14 फेब्रुवारी) आणि तिसरा एकदिवसीय (16 फेब्रुवारी) नेल्सनच्या सॅक्सटन ओव्हलवर खेळवला जाणार होता आणि शेवटचे दोन एकदिवसीय सामने क्वीन्सटाउन येथे खेळवले जाणार होते. मात्र, आता टी-20 ते वनडेपर्यंतचे सर्व सामने क्वीन्सटाउनमध्ये होणार आहेत. मात्र, त्यांच्या तारखांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सर्व सामने नियोजित तारखेलाच होतील.

Loading...
Advertisement

दक्षिण आफ्रिकेच्या वेळापत्रकातही बदल
याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघही न्यूझीलंडला जाणार आहे. त्याचे स्थानही बदलण्यात आले आहे. या दोघांमधील दोन कसोटी सामन्यांची मालिका आता क्राइस्टचर्चमध्ये खेळवली जाणार आहे. यापूर्वी या मालिकेतील दुसरा सामना वेलिंग्टन येथे होणार होता. पहिली कसोटी 17 फेब्रुवारीपासून तर दुसरी कसोटी 25 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. यानंतर न्यूझीलंड तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचे यजमानपदही भूषवणार आहे. हे सर्व सामने नेपियरमध्ये खेळवले जाऊ शकतात.

Advertisement

न्यूझीलंडमध्येच विश्वचषक स्पर्धा
स्थळ बदलताना न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट म्हणाले की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे प्रवासादरम्यान उद्भवणारा कोविड-19 चा धोका कमी होऊ शकतो. 4 मार्चपासून न्यूझीलंडमध्ये वनडे विश्वचषक खेळवला जाणार आहे. टीम इंडिया 6 मार्चपासून वर्ल्ड कप मोहिमेला पाकिस्तान विरुध्द सुरुवात करणार आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply