अमेरिकेच्या ‘त्या’ निर्णयाने चीन हैराण; चीननेही दिलेय जोरदार प्रत्युत्तर; पहा, कोरोनामुळे वाढलाय वाद..?
दिल्ली : कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्याच्या नावाखाली अमेरिकेने चीनच्या कठोर धोरणास विरोध केला आहे. देशातील आपले राजनयिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना चीनमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या या निर्णयाला आपल्या प्रतिमेला धक्का मानून चीनने हा गोंधळात टाकणारा निर्णय असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत चीनने या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे दूतावासातील कर्मचाऱ्यांमध्ये अधिक धोका निर्माण होईल, असे चीनने म्हटले आहे.
चीनच्या सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने अलीकडेच सूत्रांच्या हवाल्याने एक वृत्त प्रकाशित करून अमेरिकेच्या निर्णयाची माहिती दिली आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे, की यूएस स्टेट डिपार्टमेंट चीनमधील साथीच्या परिस्थितीचा हवाला देत आपल्या दूतावास आणि वाणिज्य दूतावासातून कर्मचाऱ्यांना काढून घेण्याच्या योजनेवर विचार करत आहे.
हाँगकाँगमधून प्रकाशित ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने वृत्त दिले आहे की, अमेरिकेचा हा निर्णय चीनमधील राजनैतिक अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या चिंतेनंतर आले आहे. ग्लोबल टाइम्सच्या अहवालाबाबत विचारले असता, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिजियान म्हणाले की, चीनचे कोरोना प्रतिबंधक नियम आंतरराष्ट्रीय करारांच्या अनुरूप आहेत. लिजियान यांनी दावा केला आहे की, चीन सध्या कोरोना व्हायरसच्या बाबतीत सर्वात सुरक्षित देश आहे.
चीनमधील कोरोना नियंत्रणाच्या कठोर उपायांबाबत लिजियान म्हणाले, की ‘चीनमधील कोरोनाविरोधी उपाय प्रोटोकॉल विज्ञानावर आधारित आहेत. आमच्या प्रभावी उपाययोजनांमुळे चीनमध्ये परदेशी नागरिकांना पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यात आले आहे. चीनच्या आरोग्य अभियानाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना संक्रमित झालेल्या 2487 रुग्णांवर चीनच्या विविध शहरांतील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, चीनमध्ये 4 फेब्रुवारीपासून हिवाळी ऑलिम्पिक सुरू होणार आहे. पण त्याच वेळी कोरोना व्हायरसचा धोका वाढला आहे. कोविड-19 मुळे, गुरुवारी होणार्या हिवाळी ऑलिम्पिकमधील 3 गेम्स व्हिलेजचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. 23 जानेवारीपासून आतापर्यंत हिवाळी ऑलिम्पिकच्या तयारीशी संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना संसर्गाची 59 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.
बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 4 ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. यानंतर 4 ते 13 फेब्रुवारी दरम्यान पॅरालिम्पिक स्पर्धा होणार आहेत. ब्रिटन, अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी या स्पर्धांवर राजनैतिक बहिष्कार टाकला आहे. नॅशनल हेल्थ कमिशनच्या म्हणण्यानुसार, चीनची राजधानी बीजिंगमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंट संसर्गाची 14 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यानंतर एकूण बाधितांची संख्या 50 झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर 24 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.
अखेर कोरोनाने झटका दिलाच..! कोट्यावधींचा खर्च गेला पाण्यात; पहा, कोणता निर्णय घेतलाय चीनने