Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अखेर कोरोनाने झटका दिलाच..! कोट्यावधींचा खर्च गेला पाण्यात; पहा, कोणता निर्णय घेतलाय चीनने

दिल्ली : चीनमध्ये 4 फेब्रुवारीपासून हिवाळी ऑलिम्पिक सुरू होणार आहे. पण त्याच वेळी कोरोना व्हायरसचा धोका वाढला आहे. कोविड-19 मुळे, गुरुवारी होणार्‍या हिवाळी ऑलिम्पिकमधील 3 गेम्स व्हिलेजचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. 23 जानेवारीपासून आतापर्यंत हिवाळी ऑलिम्पिकच्या तयारीशी संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना संसर्गाची 59 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

Advertisement

बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 4 ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. यानंतर 4 ते 13 फेब्रुवारी दरम्यान पॅरालिम्पिक स्पर्धा होणार आहेत. ब्रिटन, अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी या स्पर्धांवर राजनैतिक बहिष्कार टाकला आहे. नॅशनल हेल्थ कमिशनच्या म्हणण्यानुसार, चीनची राजधानी बीजिंगमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंट संसर्गाची 14 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यानंतर एकूण बाधितांची संख्या 50 झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर 24 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.

Advertisement

4 फेब्रुवारीपासून या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या 3 हजार खेळाडू आणि सपोर्ट स्टाफपैकी 106 जणांचा कोरोना अहवाल पॉजिटिव आला आहे. दरम्यान, बीजिंगच्या स्थानिक लोकांना कठोर कोविड प्रोटोकॉल आणि लॉकडाऊनचे पालन करावे लागत आहे. बीजिंगच्या फेंगताई जिल्ह्यात अचानक प्रशासनाने एक संदेश जारी करून 20 लाख लोकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर गेल्या आठवड्यात येथे कोरोना संसर्गाची काही प्रकरणे नोंदली गेली.

Loading...
Advertisement

त्याच वेळी, असे स्थानिक सर्दी-खोकल्याचे रुग्ण जे दुकानातून औषधोपचार घेत आहेत. त्याला 3 दिवसांत चाचणी घेण्यासही सांगण्यात आले आहे. हिवाळी ऑलिंपिकआधी त्यांच्या शून्य-कोविड धोरणाचा भाग म्हणून व्हायरसचे स्थानिक संक्रमण रोखण्याच्या योजनेवर चीनी अधिकारी काम करत आहेत. असे असूनही, स्थानिक पातळीवर ओमिक्रॉन प्रकाराच्या संसर्गाची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत.

Advertisement

फक्त टाळ्या चालतील, तोंड मात्र राहिल बंद..! चीनने ‘त्या’ स्पर्धांसाठी केलेत अजब नियम, जाणून घ्या, डिटेल

Advertisement
Advertisement

Leave a Reply