Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून रशियाच्या विरोधात ‘नाटो’ ने केलीय जोरदार तयारी; युरोपिय देशही आलेत मैदानात; पहा, कशामुळे वाढलाय तणाव

नवी दिल्ली : युक्रेन विरोधात रशियाचा वाढता आक्रमकपणा पाहता नाटो आता पूर्व युरोपमध्ये अतिरिक्त जहाजे आणि लढाऊ विमाने तैनात करत आहे. युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्याची वाढत्या हालचाली लक्षात घेता अमेरिकेच्या नेतृत्वातील नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) युक्रेन आणि युरोप सुरक्षेसाठी ही तैनाती करत आहे. नाटोने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, डेन्मार्क बाल्टिक समुद्रात एक ताफा पाठवत आहे आणि लिथुआनियामध्ये आपली चार F-16 लढाऊ विमाने देखील तैनात करत आहे. नाटो नौदलात सामील होण्यासाठी स्पेनही आपली जहाजे पाठवत आहे.

Advertisement

या निवेदनात पुढे म्हटले आहे, की फ्रान्सनेही रोमानियामध्ये आपले सैन्य नाटो कमांडकडे तैनात करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नाटोच्या पूर्वेकडील भागात आपल्या सैन्याची तैनाती वाढविण्याचा विचार करत असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

Advertisement

नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग म्हणाले, की नाटोमध्ये मित्र राष्ट्रांकडून अतिरिक्त सैन्याच्या तैनातीचे मी स्वागत करतो. नाटो आपल्या सर्व सहयोगी देशांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेईल. आमच्या सुरक्षा वातावरणात अडथळा आणण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना आम्ही प्रत्युत्तर देऊ. आमची संयुक्त सुरक्षा देखील मजबूत केली जाईल. युक्रेनला नाटोचे सदस्य व्हायचे आहे पण रशियाचा त्याला विरोध आहे.

Loading...
Advertisement

नाटोने म्हटले आहे, की 2014 मध्ये रशियाने युक्रेनमधून क्रिमियाला बेकायदेशीरपणे जोडल्याच्या प्रतिक्रिया म्हणून नाटोने पूर्वेकडील प्रदेशांमध्ये आपल्या उपस्थितीत वाढ केली आहे. यामध्ये एस्टोनिया, लॅटव्हिया, लिथुआनियामध्ये चार बहुराष्ट्रीय सैन्य तैनात करण्यात आले होते. हे संघ अनुक्रमे ब्रिटन, कॅनडा, जर्मनी आणि अमेरिका यांच्या नेतृत्वाखाली युद्धासाठी सज्ज आहेत. त्यांच्या तैनातीमुळे हे स्पष्ट होते की एका मित्रावरील आक्रमण हे संपूर्ण नाटोवरील आक्रमण मानले जाईल. 2014 पूर्वी, पूर्वेकडील नाटो देशांमध्ये कोणतेही नाटो सैन्य तैनात नव्हते.

Advertisement

.. तर आम्ही अमेरिकेलाही घाबरणार नाही..! ‘त्या’ मुद्द्यावर रशियाने दिलेय आक्रमक प्रत्युत्तर; पहा, काय आहे नेमके कारण..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply