मुंबई- भारतीय स्टार फलंदाज स्मृति मंधाना (Smriti Manadhana) हिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सर्व फॉरमॅटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी 2021 मधील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे.
तिचा सामना इंग्लंडच्या टॅमी ब्युमॉन्ट, दक्षिण आफ्रिकेच्या लिझेल ली आणि आयर्लंडच्या गॅबी लुईस यांच्याशी होता. मात्र, मंधानाने हे सर्व मागे टाकून पुरस्कार जिंकला.स्मृति मंधानाने दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे.
याआधी, ती 2018 मधील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर आणि सर्वोत्कृष्ट महिला एकदिवसीय क्रिकेटपटू देखील आहे. हा पुरस्कार दोनदा जिंकणारी मंधना ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. याआधी झुलन गोस्वामी (2007) यांनी हा पुरस्कार फक्त एकदाच जिंकला आहे. त्याच वेळी, अशी कामगिरी करणारी मंधना ही दुसरी महिला क्रिकेटर आहे. तिच्यापूर्वी, ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी हिने दोनदा (2017, 2019) वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने अनेक शानदार खेळी खेळल्या आहे. 25 वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने 2021 मध्ये 22 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 38.86 च्या सरासरीने 855 धावा केल्या. भारताचा महिला क्रिकेट संघ 2021 या वर्षात काही विशेष करू शकला नाही, परंतु स्मृति मंधाना हिने यावर्षीही अप्रतिम कामगिरी केली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत, ज्यामध्ये टीम इंडियाने T20 आणि एकदिवसीय सामन्यांसह आठ पैकी फक्त दोन सामने जिंकले. या दोन्ही सामन्यांमध्ये स्मृति मंधानाने आपल्या फलंदाजीने महत्त्वपूर्ण योगदान दिले. मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियासाठी मानधनाने 80 धावांची नाबाद इनिंग खेळली.