Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानने वाढवली IMF सह जगाचीही डोकेदुखी; पहा नेमका काय झालाय घोटाळा

Please wait..

दिल्ली : भारतातून वेगळा होऊन देश अस्तित्वात आल्यानंतर पाकिस्तानची आर्थिकदृष्ट्या फारशी स्थिती कधीच चांगली नव्हती. मात्र पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाची सत्ता हाती घेतल्यानंतर हा देश जगाच्या प्रकाशझोतात आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानला केवळ कंगालच बनवले नाही, तर अब्जावधी डॉलर्सच्या कर्जात बुडवले आहे. पाकिस्तान आता चीनसारख्या देशांचा आर्थिक गुलाम झाला आहे. पाकिस्तानवरील देशांतर्गत आणि विदेशी कर्ज 50 हजार अब्ज रुपयांच्या वर गेले आहे. पाकिस्तानचेच लोक स्वतःचे कर्ज उघड करत आहेत.

Advertisement
Loading...

अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत हुसैन हक्कानी यांनी एका ट्विटमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशची तुलना केली. हक्कानी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘पाकिस्तानने IMF (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) कडून 1958 पासून 22 वेळा कर्ज घेतले आहे, ज्यामध्ये 1988 पासून 13 वेळा आणि 2000 पासून पाच वेळा कर्ज घेतले आहे. बांगलादेशशी याची तुलना केल्यास, 1974 नंतर केवळ 10 वेळा IMF कडून कर्ज घेणे आवश्यक होते, ज्यामध्ये 2000 नंतर केवळ दोनदा घेतलेल्या कर्जाचा समावेश होतो. हक्कानी यापूर्वीही इम्रान सरकारला सूचित करताना आढळले आहेत. हुसेन हक्कानी पाकिस्तान आणि बांगलादेशची तुलना का करत आहेत ते समजून घेणे आवश्यक आहे. बांग्लादेश हा पाकिस्तानमधून बाहेर पडलेला देश आहे. जो 1971 पूर्वी पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जात होता. बांगलादेशची लोकसंख्या 16.47 कोटी आणि पाकिस्तानची लोकसंख्या 22.09 कोटी आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीतही पाकिस्तान बांगलादेशपेक्षा खूप मोठा आहे. आता GDP बद्दल बोलायचे झाल्यास पाकिस्ताननंतर अस्तित्वात आलेल्या बांगलादेशचा GDP 32,423.92 दशलक्ष अमेरिकन डॉलर आहे. त्याच वेळी, पाकिस्तानचा जीडीपी 26,3686.66 दशलक्ष अमेरिकन डॉलर आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply