Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

चीन-रशियानं ठरवलं अन् अमेरिकेला बसला झटका; अमेरिकेच्या शत्रू देशाचेही केले संरक्षण, जाणून घ्या, काय घडले..?

नवी दिल्ली : चीन आणि रशियाने उत्तर कोरियाने अलीकडेच केलेल्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणाच्या प्रत्युत्तरात उत्तर कोरियावर निर्बंध लादण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेचा हाणून पाडला आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समधून हे उघड झाले आहे. उत्तर कोरियाशी संबंधित मुद्द्यांवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीआधी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

उत्तर कोरियाने अलीकडेच सांगितले होते, की त्यांनी कोरियाच्या पूर्व समुद्रातील एका बेटावर अचूकपणे मारा करणारी दोन क्षेपणास्त्रे यशस्वीपणे सोडली आहेत. एका महिन्यात उत्तर कोरियाची ही चौथी क्षेपणास्त्र चाचणी होती. याआधी दोन वेळा हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे, याआधी त्यांनी रेल्वेमधून डागलेल्या कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचाही वापर केला होता.

Advertisement

क्षेपणास्त्र चाचणीच्या मुद्द्यावर UNSC च्या चर्चेआधी संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेचे राजदूत यांनी गुरुवारी सांगितले, की उत्तर कोरियाच्या बॅलेस्टिक मिसाइल प्रक्षेपणाची सुरक्षा परिषदेने कठोर शब्दांत निंदा करावी, असा आग्रह अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जपान आणि इतर अनेक देशांनी केला आहे. ब्राझील, फ्रान्स, जपान, युएई, ब्रिटेन आणि अमेरिकेने देखील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ठराव डावलल्याबद्दल उत्तर कोरियाचा निषेध करण्यासाठी सहकारी परिषद सदस्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले.

Loading...
Advertisement

उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणामुळे अमेरिकेने त्याच्यावर एकतर्फी निर्बंध टाकले होते. निर्बंधांनुसार, रशिया आणि चीनकडून क्षेपणास्त्र चाचणी कार्यक्रमांसाठी साहित्य खरेदी केल्याबद्दल सहा उत्तर कोरिया, एक रशियन व्यक्ती आणि एक रशियन कंपनी यांना काळ्या यादीत टाकण्यात आले. त्यानंतर अमेरिकेने यापैकी पाच लोकांवर प्रवास बंदी आणि मालमत्ता फ्रीज करण्याचा प्रस्ताव दिला होता.

Advertisement

अमेरिका-रशियाच्या वादात चीनने घेतलीय एन्ट्री; ‘त्या’ मुद्द्यावर अमेरिकेला दिलाय गंभीर इशारा

Advertisement
Advertisement

Leave a Reply