अरेरे.. चीनवर कुणाचाच विश्वास राहिला नाही..! ‘त्या’ स्पर्धांसाठी पश्चिमी देशांचा ‘असा’ आहे सुरक्षा प्लान; जाणून घ्या..
नवी दिल्ली : काही पाश्चात्य देशांतील राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्या (NOCs) पुढील महिन्यात बीजिंगमध्ये होणाऱ्या हिवाळी स्पर्धांमध्ये सायबर सुरक्षेच्या कारणामुळे त्यांच्या खेळाडूंना तात्पुरता फोन वापरण्यास सांगत आहेत. किंवा बर्नर फोन वापरा, अशा सूचना देत आहेत. अनेक राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांनी सांगितले, की ते त्यांच्या खेळाडूंना आणि कर्मचार्यांना सुरक्षा धोके टाळण्यासाठी आणि चीनमध्ये 4 ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या स्पर्धां दरम्यान परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी तात्पुरती उपकरणे देतील. युनायटेड स्टेट्स ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक समितीने म्हटले आहे, की “हे ओळखले पाहिजे की प्रत्येक मजकूर, ईमेल, ऑनलाइन भेट यांवर नजर ठेवली जाऊ शकते तसेच त्यामध्ये छेडछाड होण्याचाही धोका आहे.
अमेरिकेने आपल्या खेळाडूंना बीजिंगमध्ये भाडोत्री किंवा डिस्पोजेबल लॅपटॉप आणि फोन वापरण्यास सांगितले आहे. जर खेळाडू आपले वैयक्तिक फोन किंवा लॅपटॉप यांसारखी उपकरणे घेऊन जात असतील तर त्यांनी चीन मध्ये जाण्याआधी आणि चीनमधून बाहेर पडताना सर्व डेटा डिलीट करावा. अमेरिका सोडण्याआधी सर्व सदस्यांनी त्यांच्या डिव्हाइसवर व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) स्थापित करण्याची शिफारस देखील केली आहे. अमेरिकेने म्हटले आहे, की त्यांच्या सिस्टम आणि डेटाचे संरक्षण करण्यासाठी सुरक्षा उपाय असूनही चीनमध्ये काम करताना डेटा सुरक्षा किंवा गोपनीयतेची अपेक्षा करू नये. तथापि, या प्रकरणावर बीजिंग ऑलिम्पिक अधिकार्यांकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
कॅनडाच्या ऑलिम्पिक समितीने सांगितले, की त्यांनी सदस्यांना त्यांचे वैयक्तिक उपकरण बरोबर न नेण्याचा विचार करावा आणि अतिरिक्त सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. स्वीडिश समित्या त्यांच्या प्रतिनिधी मंडळांना नवीन उपकरणे देखील प्रदान करतील आणि त्यांना सायबर सुरक्षेच्या विरोधात काय उपाययोजना करता येतील याची माहिती देतील. स्वीडिश समितीने सांगितले की, “आम्ही खेळाडूंना चीनमधील परिस्थितीची माहिती देखील देत आहोत, जेणेकरून ऑलिम्पिक दरम्यान वैयक्तिक उपकरणे वापरायची की नाही याबद्दल खेळाडू स्वतःचे निर्णय घेऊ शकतील,” असे स्वीडिश समितीने म्हटले आहे.
संशोधकांनी सांगितले की बीजिंग आयोजन समितीच्या MY2022 अॅपमध्ये सुरक्षा त्रुटी आहेत. चीनने सर्व उपस्थितांना त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी MY2022 वापरण्यास सांगितले आहे. बीजिंग आयोजन समितीच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख यू होंग म्हणाले की, अशा प्रकारचे अॅप विकसित करताना अशा समस्या येणे स्वाभाविक होते, ज्याला सामोरे जाण्यासाठी त्यांचा विभाग सतत अपडेट करत असतो.
.. म्हणून अमेरिकेवर चांगलाच भडकलाय चीन..! पहा, आता कोणत्या पाण्यामुळे पेटलाय दोन्ही देशांत वाद.. ?