Take a fresh look at your lifestyle.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षच म्हणतात.. ‘त्या’ संकटापुढे थकलाय अमेरिका, लोकही हैराण; पहा, काय घडलेय अमेरिकेत..?

नवी दिल्ली : अमेरिकेत कोरोना संसर्गाची प्रकरणे अतिशय वेगाने वाढत आहेत. येथे एका दिवसात लाखोंच्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला, कठोर उपाययोजना केल्या तरी देखील कोरोना काही थांबला नाही. या आजाराने जागतिक महासत्ता म्हणून मिरवणारा हा देश अगदीच हैराण झाला आहे. देशाचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेने यांनीच आता ही वस्तुस्थिती मान्य केली आहे. बायडेन म्हणाले, की कोरोना संकटामुळे आता अमेरिकेतील लोक थकले आहेत आणि त्यांचे मनोबलही कमी झाले आहे.

Advertisement

या संकटावर मात करण्यासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले. बायडेन प्रशासनाचा एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले.

Advertisement

अमेरिकेत दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडल्या आहेत. जागतिक महासत्ता असलेला हा देश सध्या कोरोनाने प्रचंड हैराण झाला आहे. या व्यतिरिक्त जगातील अन्य देशांनाही कोरोना त्रासदायक ठरत आहे. युरोपातील अनेक देश या आजाराने हैराण झाले आहेत. मागील काही दिवसांपासून मात्र येथे कोरोनाचा वेग थोडा कमी झाला आहे. मात्र, धोका अजूनही कायम आहे. कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येत आहेत.

Advertisement

चीनमध्येही कोरोनाने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात कठोर प्रतिबंध याच देशात आहेत. येथे कोरोना रुग्णांची संख्या अद्याप जास्त नाही. तरी देखील सरकारने निर्बंध अत्यंत कठोर केले आहेत. चीनमधील बीजिंग शहरात पुढील महिन्यात हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. मात्र, त्याआधी येथे कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना रोखण्यासाठी चीनने अत्यंत कठोर निर्णय घेतले आहेत. स्पर्धा सुरू होण्याआधी येथे कोरोना नियंत्रणात राहिल यासाठी सरकार जोरदार प्रयत्न करत आहे.

Advertisement

आता फक्त 300 रुपयांत होणार कोरोना तपासणी; पहा, कोणत्या राज्याने केल्यात तपासणीचे दर कमी

Advertisement
Advertisement

Leave a Reply