Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

फक्त टाळ्या चालतील, तोंड मात्र राहिल बंद..! चीनने ‘त्या’ स्पर्धांसाठी केलेत अजब नियम, जाणून घ्या, डिटेल

मुंबई : चीनमध्ये पुढील महिन्यात हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. कोरोनाचे संकट वाढत असताना या स्पर्धा होत आहेत. त्यामुळे चीनने या स्पर्धांची तयारी करण्याबरोबरच नियमही अत्यंत कठोर केले आहेत. कोरोनाचा धोका पाहता असे काही नियम केले आहेत की ज्यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हिवाळी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंधनकारक आहे किंवा त्यांना दीर्घ काळासाठी आयसोलेशनमध्ये रहावे लागेल.

Advertisement

4 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक दरम्यान खेळाडू, अधिकारी आणि येथे भेट देणाऱ्या प्रत्येकाला कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. स्पर्धा आणि प्रशिक्षण वगळता अन्य प्रत्येक वेळी खेळाडूंना मास्क वापरावे लागतील. या दरम्यान संघातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्यांचा कडकडाट करता येईल पण, ओरडणे किंवा मोठ्याने बोलता मात्र येणार नाही. ज्यांची कोरोना तपासणी पॉजिटिव येईल त्यांना अलग करण्यात येईल आणि पूर्ण बरे होईपर्यंत त्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

Advertisement

या स्पर्धा सुरू होण्यास आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत आणि येथे टोक्यो ऑलिम्पिकपेक्षाही नियम अत्यंत कठोर आहेत. कठोर निर्णय घेणे आणि त्या निर्णयांची तितक्यात कठोरपणे अंमलबजावणी करण्यात चीन जगभरात ओळखला जातो. त्यामुळे चीनने जे नियम केले आहेत त्यांची अंमलबजावणी होणारच हे निश्चित आहे.

Loading...
Advertisement

चीनमध्ये पोहोचल्यानंतर आधी प्रत्येकाचे तापमान मोजले जाईल. त्यानंतर त्यांची कोरोना तपासणी करण्यात येईल. तपासणीचा निकास साधारण सहा तासात येईल. तोपर्यंत या सर्वांना स्वतंत्रपणे रहावे लागेल. तपासणीचे निकाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना पुढे प्रवेश देण्यात येईल. चाहते, दर्शकांना उपस्थित राहाता येईल की नाही, याबाबत अद्याप काही स्पष्ट नाही. परंतु, जर मंजुरी मिळाली तर कमी प्रमाणात असेल असे सांगण्यात येत आहे.

Advertisement

बापरे.. चीनने घेतलाय ‘त्याचा’ धसका..! तब्बल दीड कोटी लोकांची करणार तपासणी; जाणून घ्या, काय आहे प्रकार ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply