बापरे.. ‘येथे’ ओमिक्रॉन सुस्साट..! फक्त एकाच शहरात निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण; पहा, काय आहे परिस्थिती
मुंबई : रशियामध्ये कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराचा संसर्ग खूप वेगाने पसरत आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमधील 50 टक्क्यांहून अधिक कोरोना संक्रमितांमध्ये ओमिक्रॉन आढळले आहेत. परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे, कारण Omicron धोका जास्त वाढला आहे. अलीकडील अभ्यासानुसार ओमिक्रॉन संक्रमित रुग्ण 41 टक्के होते. मात्र, मॉस्कोच्या महापौरांनी सांगितले, निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण याच प्रकारातील आहेत.
रशियामध्ये गेल्या 24 तासांत 23,820 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मॉस्कोमध्ये सर्वाधिक 5,712 नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, सेंट पीटर्सबर्गमध्ये 2,708 आणि मॉस्कोमध्ये 1,990 प्रकरणे नोंदवली गेली. फेडरल रिस्पॉन्स सेंटरने सांगितले की, आतापर्यंत देशात एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येने 1.07 कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत 24,952 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशा प्रकारे, आतापर्यंत बरे झालेल्या लोकांची संख्या 98,09,300 झाली आहे.
दरम्यान, भारतात सुद्धा कोरोना संकटात रुग्णांची संख्या अतिशय वेगाने वाढत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दैनंदिन संसर्गाचा दर दोन टक्के होता, तो आता 15 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे, म्हणजेच दोन आठवड्यात तो 13 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत दैनंदिन संसर्ग दर 30 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. साप्ताहिक संसर्ग दरही दुहेरी अंकावर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज समोर येणाऱ्या नवीन प्रकरणांची संख्या वेगाने वाढत आहे, परिणामी अॅक्टिव्ह प्रकरणे देखील 220 दिवसांच्या सर्वाधिक आहेत.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 24,383 नवीन रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत 92,273 अॅक्टिव्ह प्रकरणे आहेत. त्याच वेळी, आज उत्तराखंडमध्ये कोरोना विषाणूचे 3,200 नवीन रुग्ण आढळले आहेत. आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 11,317 नवे रुग्ण आढळले आहेत. शहरात 84,352 अॅक्टिव्ह प्रकरणे आहेत. पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे 22,645 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. सध्या बंगालमध्ये 1,45,483 अॅक्टिव्ह प्रकरणे आहेत.
Corona Update : देशभरात आज कोरोनाचे ‘इतके’ रुग्ण; पहा, किती आहे संक्रमण दर..