Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

चीनला झटका देण्यासाठी ‘हे’ देश सज्ज; पहा कशा पद्धतीने उघडलीय आघाडी

दिल्ली : चीनसोबतच्या वाढत्या तणावादरम्यान तैवान आपल्या किलर पाणबुड्या तैनात करण्याच्या अगदी जवळ आहे. अमेरिका आणि ब्रिटनच्या सहकार्याने तैवानचा गुप्त पाणबुडीचा कार्यक्रम वेगाने पुढे जात आहे. अलीकडील अहवालानुसार, तैवानचा स्वदेशी पाणबुडी बांधण्याचा प्रकल्प पूर्णत्वाकडे आहे. त्यानंतर या पाणबुड्या दक्षिण चीन समुद्रात चीनविरोधात तैनात केल्या जातील. तैवानच्या पाणबुडी बांधण्याच्या कार्यक्रमात ब्रिटनने सर्वाधिक योगदान दिले आहे. गेल्या तीन वर्षांत ब्रिटनने आपल्या देशातील अनेक कंपन्यांना पाणबुड्यांचे घटक, सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान तैवानला निर्यात करण्याची परवानगी दिली आहे. यूकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाकडून माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही देशांमधील पाणबुडी बांधणीबाबतचे सहकार्य अलीकडच्या काळात वाढले आहे.

Loading...
Advertisement

रॉयटर्सच्या अहवालात निवृत्त ब्रिटीश नेव्ही कमोडोर इयान मॅकगीचे वर्णन तैवानच्या पाणबुडी बांधणीच्या जवळची व्यक्ती म्हणून केले आहे. त्यांनी तैवानच्या पाणबुडी कार्यक्रमासाठी जिब्राल्टरमधील अभियंते आणि माजी मरीनची भरती केल्याचा दावा केला जातो. तैवानने इतर किमान पाच देश, दक्षिण कोरिया, भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि स्पेनमधील अभियंते, तंत्रज्ञ आणि माजी नौदल अधिकारी नेमले आहेत, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल आल्यानंतर चीनने भारत आणि अमेरिकेसह 6 देशांना तैवानला मदत न करण्याबाबत इशारा दिला आहे. तैवानला पाणबुडी तयार करण्यासाठी तंत्रज्ञान, मदत देण्यासंदर्भात अशा प्रकारच्या हालचालीमुळे बीजिंगसोबतच्या त्यांच्या द्विपक्षीय संबंधांना हानी पोहोचू शकते, असे चीनने म्हटले आहे. तैवानच्या पाणबुडी बांधणीसाठी प्रस्तावित डिझाइन सादर करणाऱ्या अमेरिका, जपान आणि युरोपियन युनियनच्या सहा कंपन्यांमध्ये भारतीय कंपनीचाही समावेश असल्याचा दावा केला जात आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply