Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

चीनी ट्रॅपमध्ये अडकले खासदार; पहा नेमका काय प्रकार घडलाय ब्रिटनमध्ये

दिल्ली : ब्रिटनची गुप्तचर संस्था MI-5 ने चीनमधील एका महिला गुप्तहेरबाबत खासदारांना इशारा दिला आहे. भारताचा शेजारी असलेल्या कुरापतखोर चीनच्या ट्रॅपमध्ये काही ब्रिटीश खासदार अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे. MI-5 च्या या इशाऱ्यात ब्रिटनच्या लेबर पार्टीला देणगी देणारी महिला चीनची गुप्तहेर असल्याचे म्हटले आहे. या महिलेचे ब्रिटनच्या माजी खासदाराशीही जवळचे संबंध असल्याचे बोलले जात आहे. MI-5 ने सांगितले की, क्रिस्टीन ली नावाच्या महिलेवर सुरक्षा यंत्रणांकडून नजर ठेवण्यात आली होती. त्याच्यावर चिनी कम्युनिस्ट पक्षासाठी हेरगिरी केल्याचा संशय आहे.

Loading...
Advertisement

या चिनी गुप्तहेरला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असे ब्रिटिश गुप्तचर संस्थेने म्हटले आहे. अशा स्थितीत त्यांची सध्या देशातून हकालपट्टी करण्यात येत नाही. ब्रिटिश संसदेच्या स्पीकरच्या संसदीय सुरक्षा पथकाने आज वेस्टमिन्स्टरमधील सर्व खासदार आणि सहकाऱ्यांना इशारा संदेश पाठवला. त्यात म्हटले आहे की, क्रिस्टीन ली या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या युनायटेड फ्रंट अफेयर्स विभागाच्या वतीने राजकीय हस्तक्षेपाच्या कारवायांमध्ये जाणूनबुजून गुंतल्या होत्या. सध्या ब्रिटनमधील कोणत्याही राजकारण्याचा कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात सहभाग असल्याचा संशय नाही, असे स्पीकरने स्पष्ट केले आहे. क्रिस्टीन ली या लंडनस्थित वकील आहेत. त्या लंडनमधील चिनी दूतावासाच्या माजी मुख्य कायदेशीर सल्लागारही होत्या. त्या सध्या ओव्हरसीज चायनीज अफेयर्सच्या कार्यालयाच्या कायदेशीर सल्लागार आहेत. त्या वेस्टमिन्स्टरमधील इंटर-पार्टी चायना ग्रुपच्या सचिव देखील आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply