Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्यामुळे’ आपल्यापुढे आलेय आरोग्याचे मोठे संकट; पहा, कशा पद्धतीने पर्यावरणही आलेय धोक्यात

नवी दिल्ली : वायू प्रदूषण ही संपूर्ण जगासाठी मोठी समस्या बनत आहे. प्रदूषणाच्या वाढीसाठी अनेक घटक आहेत आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजनाही केल्या जात आहेत. मात्र दिवसेंदिवस वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीशी निगडीत प्रदूषणामुळे भावी पिढीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे, की वाहतूक संबंधित प्रदूषणामुळे जगभरातील 20 लाख मुलांना दमा होऊ शकतो. ‘द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ’ या जर्नलमध्ये हा अहवाल प्रकाशित झाला आहे.

Advertisement

जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातील पर्यावरण आणि व्यावसायिक आरोग्याच्या प्राध्यापकांनी सांगितले की, त्यांच्या संशोधनात असे आढळून आले आहे, की नायट्रोजन डायऑक्साइडमुळे मुलांमध्ये दम्याचा धोका वाढत आहे आणि ही समस्या विशेषतः शहरी भागात जास्त आहे. यावरून हे स्पष्ट होते, की मुलांना निरोगी ठेवायचे असेल तर स्वच्छ हवेचे धोरण महत्त्वाचे मानले पाहिजे. एनेनबर्ग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहने, पॉवर प्लांट्स आणि औद्योगिक प्रकल्पांच्या आसपास नायट्रोजन डायऑक्साइड (NO2) चा अभ्यास केला आहे. यासह, त्यांनी 2019 ते 2020 या कालावधीत मुलांमध्ये दम्याच्या नवीन प्रकरणांचा मागोवा घेतला. दमा हा एक जुनाट आजार आहे ज्यामध्ये फुफ्फुसांच्या वायुमार्गात जळजळ होते.

Advertisement

यापूर्वी, जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना असे आढळून आले होते, की जगभरातील मुलांमध्ये NO2 हे 13 टक्के अस्थमाचे कारण होते आणि अधिक लोकसंख्या असलेल्या 250 शहरांमध्ये 50 टक्के दम्याचे कारण होते. असेही आढळून आले होते, सन 2000 मध्ये मुलांमध्ये अस्थमाचे प्रकरणे 20 टक्के होते, जे 2019 मध्ये 16 टक्क्यांवर आले. युरोप आणि अमेरिकेच्या काही भागांमध्ये स्वच्छ हवेचा फायदा विशेषत: गजबजलेल्या रस्त्यांजवळ आणि औद्योगिक प्रकल्पांजवळ राहणाऱ्या मुलांना झाला आहे. म्हणून, उच्च उत्पन्न असलेल्या देशांना NO2 उत्सर्जन अधिक प्रभावीपणे रोखण्याची अजूनही गरज आहे.

Advertisement

दुसर्‍या अभ्यासात, एनेनबर्ग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असे आढळून आले, की 2019 मध्ये 18 लाख मृत्यू शहरी वायू प्रदूषणाशी संबंधित असू शकतात. एनेनबर्ग म्हणाले की जीवाश्म-इंधन वाहतूक कमी करून आम्ही मुले आणि वृद्धांसाठी स्वच्छ हवेचे नियोजन करू शकतो. यामुळे मुलांमध्ये दमा कमी होऊ शकतो. यासोबतच हरितगृह वायूंचे उत्सर्जनही कमी होईल, ज्यामुळे आरोग्यदायी वातावरण निर्माण होऊ शकेल.

Loading...
Advertisement

2019 मध्ये, नायट्रोजन डायऑक्साइड (NO2) हे मुलांमध्ये दम्याच्या अंदाजे 18.5 लाख नवीन प्रकरणांचे कारण होते. यापैकी दोन तृतीयांश शहरी भागात होते. अमेरिकेसह इतर श्रीमंत देशांमध्ये स्वच्छ हवेसाठी अवलंबलेल्या कठोर उपाययोजनांमुळे मुलांमध्ये NO2 शी संबंधित दम्याची प्रकरणे कमी झाली आहेत. युरोप आणि अमेरिकेतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा असूनही, दक्षिण आशिया, उप-सहारा आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये, विशेषत: NO2 मुळे हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. दक्षिण आशिया आणि उप-सहारा आफ्रिकन देशांमध्ये मुलांमध्ये NO2-संबंधित दमा ही एक प्रमुख सार्वजनिक आरोग्य समस्या आहे.

Advertisement

बाब्बो.. दिल्ली नाही तर हे शहर ठरलयं सर्वात प्रदूषित; पहा, कसे वाढलेय प्रदूषण..?

Advertisement

‘त्या’मुळे 100 कोटी मुले संकटात; पहा नेमके काय वाढून ठेवलेय आपणच जगापुढे

Advertisement
Advertisement

Leave a Reply