Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. आता जगातील ‘इतक्या’ देशात पोहोचलाय ओमिक्रॉन; ‘त्यासाठी’ आरोग्य विभागाने केलाय ‘हा’ प्लान

नवी दिल्ली : जगभरातील अनेक देशात ओमिक्रॉनने थैमान घातले आहे. भारतातही या व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णात वाढ होत आहे. तर हा व्हेरिएंट आता जगातील तब्बल 149 देशांमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे या देशात कोरोनाचे रुग्ण अतिशय वेगाने वाढत आहेत. दिलासादायक एकमेव गोष्ट म्हणजे आधीच दिलेली लस केवळ संसर्ग होण्यापासून संरक्षण करत नाही तर रुग्णालयात दाखल होण्याची गरज देखील कमी करत आहे. यामुळेच सरकारने पुन्हा एकदा सर्व लोकांना लवकरात लवकर लस घेण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

ओमिक्रॉनमुळे देशात आणि जगातील परिस्थितीबाबत माहिती देताना आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव म्हणाले, की 10 जानेवारी रोजी संपूर्ण जगात कोरोना रुग्णांची संख्या 31 लाख 59 हजारांवर पोहोचली. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 4 कोटी 70 लाख आहे. देशात संसर्ग वेगाने वाढत आहे. 4 जानेवारीला जिथे फक्त 78 जिल्ह्यांमध्ये संसर्गाचा दर 5 टक्क्यांहून अधिक होता, तिथे 11 जानेवारीला 300 जिल्ह्यांमध्ये संसर्गाचा दर 5 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे.

Advertisement

कोलकाता शहरात संसर्गाचा दर 60 टक्क्यांहून अधिक झाला आहे, तर संपूर्ण बंगालमध्ये 32 टक्क्यांहून अधिक आहे. बुधवारी 1 लाख 94 हजार नवीन रुग्ण सापडले. आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ओमिक्रॉनच्या तिसऱ्या लाटेत 96 टक्के रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नाहीत आणि ते तीन ते सात दिवसांत होम आयसोलेशनमध्ये राहून पूर्णपणे बरे होत आहेत. बहुतेक अशाच रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते, जे आधीच कोणत्या ना कोणत्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. हे पाहता, होम आयसोलेशनच्या रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी एक ठोस यंत्रणा असणे हे आरोग्य मंत्रालयाचे पहिले धोरण आहे. दुसरी रणनीती म्हणजे जिल्हा पातळीवर आवश्यक संख्येने रुग्णवाहिकांची व्यवस्था करणे जेणेकरुन परिस्थिती बिघडल्यास कोणत्याही संक्रमित व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करता येईल.

Loading...
Advertisement

तिसरी रणनीती म्हणजे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहणे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, वेगाने वाढणाऱ्या संसर्गामुळे देशात एका दिवसात 20 लाखांपर्यंत रुग्ण सापडू शकतात. अशा परिस्थितीत 5 टक्के रुग्णांसाठी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची मोठ्या प्रमाणावर गरज भासू शकते. त्यामुळेच राज्यांना तयारी करण्यास वारंवार सांगण्यात येत आहे.

Advertisement

Corona Update : देशात आज सापडलेत ‘इतके’ कोरोना रुग्ण; जाणून घ्या, देशातील कोरोनाची परिस्थिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply