Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

… अन् तरीही पाकिस्तान मध्ये ना शाळा बंद.. ना लॉकडाऊन; सरकारने दिलाय स्पष्ट नकार

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस प्रकरणांमध्ये वेगाने वाढ होत असतानाही पाकिस्तान सरकारने शाळा बंद करण्यास आणि लॉकडाऊन जाहीर करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री चौधरी यांनी मंगळवारी सांगितले की, सरकारला देशातील वाढत्या कोरोना परिस्थितीची जाणीव आहे. मात्र, देशात आणखी एका लॉकडाऊन केला जाणार नाही आणि शाळा देखील बंद केल्या जाणार नाहीत.

Advertisement

देशातील कोरोना पॉजिटिव दरात वेगाने वाढ होत असल्याची माहिती मंत्रिमंडळाला देण्यात आली असल्याचेही मंत्री म्हणाले. पण आम्ही पाकिस्तानमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करणार नाही हा आमचा संकल्प आहे. आपली अर्थव्यवस्था दुसर्‍या लॉकडाऊनचा भार सहन करू शकत नाही. चौधरी यांनी भर दिला की देश कोरोना व्हायरसचा सामना करू शकतो आणि सरकार लॉकडाऊन करणार नाही. तथापि, परिस्थितीवर लक्ष ठेवणे सुरू राहील. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशवासीयांना मास्क वापरण्याचे आवाहनही मंत्र्यांनी केले आहे. चौधरी म्हणाले की, देशात उत्कृष्ट पद्धतीने लसीकरण मोहीम सुरू आहे.

Advertisement

दरम्यान, जगभरात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत चालले आहेत. अमेरिकेतील कोरोना प्रकरणांनी पुन्हा एकदा आधीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. देशात साथीच्या आजारानंतर दुसऱ्यांदा एका दिवसात 10 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत, ही मोठी चिंतेची बाब बनली आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, सोमवारी अमेरिकेत 10.13 लाख नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मागील आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिकेत प्रथमच 10 लाख प्रकरणे समोर आली होती.

Loading...
Advertisement

याआधी 3 जानेवारी रोजी अमेरिकेत 10.03 लाख प्रकरणे नोंदवली गेली होती. जेव्हापासून कोरोनाने अमेरिकेत थैमान घातले आहे, तेव्हापासून परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. जगात या संकटाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. सध्या तरी रुग्ण कमी होण्याची शक्यता नाही.

Advertisement

पाकिस्तानमध्ये लोकांना आणखी एक झटका..! ‘त्यासाठी’ द्यावा लागणार कर.. पहा, काय केलेय सरकारने ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply