Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

चीनचा दडपशाहीचा कारभार..! ‘त्या’ लहान देशाला त्रास देण्यासाठी केलाय ‘हा’ कारनामा..

नवी दिल्ली : तैवानच्या मुद्द्यावर चीन आणि लिथुआनिया या दोन्ही देशांत काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. चीन या लहान देशावर सातत्याने दबाव टाकत आहे. आता मात्र या देशाला अमेरिका आणि जर्मनीचा पाठिंबा दिला आहे. या दोन्ही देशांनी चीनच्या विरोधात लिथुआनियाचे समर्थन केले आहे. त्यानंतर आता या देशाने थेट चीनला आव्हान देणे सुरू केले आहे. चीनच्या धमक्यांना न घाबरता चीनला त्रास होईल, असे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

या देशाने चीनच्या मालकीच्या कंपनीसोबतचा रेल्वे करार रद्द केला आहे. त्यानंतर मात्र चीन चांगलाच भडकला असून या देशास प्रत्युत्तर दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीन या लहान देशास सातत्याने त्रास देत आहे. आता चीनने दादागिरी करत येथील आयात व्यापार बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. चीन याद्वारे जागतिक पुरवठा साखळीलाही टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

याआधी ऑस्ट्रेलियाने ज्यावेळी कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती त्यावेळीही चीनने या देशास असाच त्रास दिला होता. त्यानंतर आता लिथुआनिया या युरोपीय देशावर आयात प्रतिबंध टाकून युरोपियन युनियनच्या बाकी देशांना असा संदेश देत आहे, की चीनवर कधीही प्रश्न उपस्थित करू नयेत. आता अशीही भीती व्यक्त केली जात आहे, की चीन या लहान देशाला त्रास देण्याच्या नावाखाली जागतिक पुरवठा साखळीही अडणीत आणू शकतो. मात्र, चीनी प्रवक्त्याने असे दावे फेटाळून लावले आहेत.

Advertisement

दरम्यान, लिथुआनियाने मागील वर्षात तैवानला आपल्या देशात कार्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली होती. जगातील अनेक देश चीनच्या भीतीखातर असे निर्णय घेण्याचे धाडस दाखवत नाहीत. मात्र, लिथुआनिया सारख्या लहान देशाने असा निर्णय घेत सगळ्यांनाच आश्चर्यात टाकले. त्यामुळे चीन या देशावर चांगलाच संतापला आहे. दोन्ही देशांतील तणावही वाढला आहे.

Loading...
Advertisement

चीन तैवानला आपला हिस्सा मानतो त्यामुळे तैवानला कोणतीही राजनयिक ओळख मिळू देत नाही. परंतु, लिथुआनियाने घेतलेल्या निर्णयामुळे चीन अस्वस्थ झाला. प्रत्युत्तर म्हणून चीनने या देशातील आपल्या राजदूतास माघारी येण्यास सांगितले आणि बीजिंगमधील लिथुआनियाच्या राजदूतास माघारी जाण्यास सांगितले. हा वाद वाढत असताना आता अमेरिका आणि जर्मनी लिथुआनियाच्या मदतीस आले आहे. चीनकडून सुरू असलेल्या कारवायांवर अमेरिकेने काळजी व्यक्त केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन म्हणाले, की चीन युरोपीय आणि अमेरिकी कंपन्यांवर दबाव टाकत आहे. लिथुआनियाचा बहिष्कार करण्यासाठी या कंपन्यांना त्रास देत आहे.

Advertisement

18 नोव्हेंबर रोजी लिथुआनियाने चीनच्या सततच्या धमक्यांना न जुमानता तैपेईऐवजी तैवानच्या नावाने प्रतिनिधी कार्यालय स्थापन करण्यास परवानगी दिली. लिथुआनियाच्या या कारवाईने चीनमध्ये खळबळ उडाली होती. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने 18 नोव्हेंबर रोजी एका निवेदनात म्हटले होते, की लिथुआनियाचा हा निर्णय चीनचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेस कमी करतो. तसेच हा प्रकार चीनच्या अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप ठरतो.

Advertisement

बाब्बो.. आधी चीनच्या कर्जाच्या जाळ्यात फसला, आता चीनकडेच मागतोय मदत; पहा, कोणत्या देशावर आलीय ‘ही’ वेळ

Advertisement
Advertisement

Leave a Reply