Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अमेरिका आणि ब्रिटेनमध्ये कोरोना आऊट ऑफ कंट्रोल; जाणून घ्या, अन्य देशांतील परिस्थिती..

नवी दिल्ली : एक दिवसाआधीच्या तुलनेत ब्रिटनमध्ये कोरोना संसर्गाच्या नवीन प्रकरणांमध्ये थोडी घट झाली आहे, परंतु परिस्थिती अजूनही गंभीर आहे. सरकारी आकडेवारीनुसार, रविवारी 1,41,472 नवीन प्रकरणे समोर आली. शनिवारी 1,46,390 रुग्ण आढळले होते. एक दिवसापूर्वीच्या तुलनेत परिस्थिती चांगली दिसत असली तरी गेल्या आठवड्यात 12 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. हा आकडा त्याआधीच्या आठवड्यापेक्षा 6.6 टक्क्यांनी जास्त आहे.

Advertisement

फ्रान्समध्ये एका दिवसात कोरोना संसर्गाची 2,96,097 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, फ्रान्समध्ये विक्रमी ३,८४७ संक्रमित रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. दुसरीकडे, इटलीमध्ये रविवारी 1,55,659 नवीन रुग्ण आढळले. रुग्णालयातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 74 लाखांहून अधिक संक्रमित आढळले आहेत.

Advertisement

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आशियाई देश सायप्रसमध्ये कोरोनाचा एक नवीन प्रकार सापडला आहे. त्याची अनुवांशिक रचना डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या काही म्युटेशनसारखी आहे. ज्यामुळे त्याला ‘डेल्टाक्रॉन’ असे म्हणतात. मात्र, सद्यस्थितीत याला चिंतेचे कारण म्हटले जात नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सायप्रसमध्ये घेतलेल्या 25 नमुन्यांमध्ये ओमिक्रॉनचे 10 म्युटेशन आढळले. यापैकी 11 नमुने संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांचे होते.

Advertisement

सायप्रस विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी आणि आण्विक विषाणूशास्त्राच्या प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. लिओनडिओस कोस्ट्रियाकिस म्हणाले की, रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये व्हायरसमध्ये म्युटेशन दिसून आले आहे. सायप्रसच्या आरोग्यमंत्र्यांनी अद्याप चिंतेचे कारण म्हणून वर्णन केलेले नाही.

Loading...
Advertisement

त्याचवेळी अमेरिकेत कोरोनाचा वेगअनियंत्रित होताना दिसत आहे. दररोज सरासरी सात लाख नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. शुक्रवारी अमेरिकेत सर्वाधिक 8.49 लाख रुग्ण आढळले. देशात सरकारी कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, कोरोनाच्या नव्या लाटेमुळे देशातील प्रशासकीय संरचना कमकुवत होऊ लागली आहे.

Advertisement

सरकारी कार्यालये, हॉटेल, स्टेडियम, देशांतर्गत विमान, बँका आणि इतर सार्वजनिक ठिकाणी भेट देण्यासाठी नेपाळ सरकारने लस कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम 17 जानेवारीपासून लागू होणार आहे. वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉन व्हायरसला रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या एका आठवड्यापासून नेपाळमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोविड क्रायसिस मॅनेजमेंट सेंटरने रविवारी कोरोना रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. फेब्रुवारीपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

Advertisement

कोरोनाचा धसका..! मागणी वाढली म्हणून कंपन्यांनी केलाय ‘हा’ जबरदस्त प्लान; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply