Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानचे संकट वाढले..! म्हणून पंतप्रधान करणार चीनचा दौरा.. पहा, काय सुरू आहे शेजारच्या देशात

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुढील महिन्यात चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सध्या सरकार आर्थिक आव्हानांव्यतिरिक्त वाढती महागाई, मिनी बजेट आणि वाढत्या कर्जामुळे विरोधकांच्या निशाण्यावर आहे. द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी पुढील महिन्यात बीजिंगला भेट देण्याची तयारी करत असताना, इम्रान खान यांनी पाकिस्तानमधील चिनी गुंतवणुकीला अडथळा आणणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्याचे आदेश दिल्याचे स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे.

Advertisement

पाकिस्तानी वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनने बुधवारी चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) बद्दल म्हटले आहे की, इम्रान खान यांनी परदेशी गुंतवणूकदारांसाठी मार्ग सुलभ करण्यासाठी 37 नियम काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, पंतप्रधान दर 15 दिवसांनी CPEC प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती वैयक्तिकरित्या घेतील.

Advertisement

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत देशाची व्यापार तूट 24.79 अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे वार्षिक आधारावर आयातीत होणारी 63 टक्के वाढ. निर्यातीतील प्रचंड वाढीमुळे व्यापारी तूट वाढली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, जुलै-डिसेंबर कालावधीतील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, आयात एका वर्षापूर्वी 24.47 बिलियन डॉलरवरून 39.91 बिलियन डॉलरवर पोहोचली आहे.

Loading...
Advertisement

याउलट, जुलै-डिसेंबर या कालावधीत निर्यात देखील 25 टक्क्यांनी वाढून 15.13 अब्ज डॉलर झाली आहे. पाकिस्तानला सध्या आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत असून विरोधक मिनी बजेटवरून सरकारवर टीका करत आहेत. विरोधकांनी देशातील वाढत्या महागाईबद्दल सत्ताधारी सरकारवर टीका केली आहे आणि आव्हाने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Advertisement

नव्या वर्षात पाकिस्तानला आणखी एक झटका..! लोकांचे बजेटच बिघडले.. पहा, नेमके काय घडलेय ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply