Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

तंत्रज्ञानाची कमाल.. बटण दाबताच रंग बदलणार ‘ही’ शानदार कार; जाणून घ्या, काय आहे तंत्रज्ञान ?

मुंबई : वाहन निर्माता कंपनी BMW ने एक नवीन तंत्रज्ञान सादर केले आहे, ज्यामध्ये बटण दाबल्यानंतर कारचा रंग बदलतो. कंपनीने जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कार्यक्रम CES 2022 मध्ये आपल्या नवीनतम इलेक्ट्रिक कार iX द्वारे डेमो सादर केला. जिथे BMW कारचा रंग आपोआप बदलत असल्याचे दिसून आले.

Advertisement

BMW चे हे नवीन तंत्रज्ञान पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये BMW iX इलेक्ट्रिक कारचा रंग आपोआप बदलताना दिसत आहे. जर्मन ऑटोमेकरची ही पेंट स्कीम दोन वेगवेगळ्या रंगांमध्ये बदलू शकते. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, BMW iX इलेक्ट्रिक कार स्वतःहून पांढऱ्या ते गडद राखाडी रंगात बदलताना दिसत आहे. तथापि, या तंत्रज्ञानाबद्दल कंपनीने आधीच सांगितले होते, की ते अशा तंत्रज्ञानावर काम करत आहेत, ज्याच्या मदतीने BMW कार बटण दाबल्यावर त्यांचा रंग बदलू शकतील.

Advertisement

BMW ने आपली इलेक्ट्रिक SUV BMW IX कार 15 डिसेंबर रोजी भारतीय बाजारात लॉन्च केली होती. ही इलेक्ट्रिक कार पॉवर आणि रेंजमध्येही चांगली आहे. BMW ची ही नवीन इलेक्ट्रिक SUV एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 425 किमी पर्यंत चालू शकते. ही कार पूर्णपणे बिल्ट-अप युनिट (CBU) आहे. भारतीय बाजारपेठेत ऑडी, मर्सिडीज सारख्या इलेक्ट्रिक लक्झरी कारला बीएमडब्ल्यू कार जोरदार टक्कर देत आहे.

Loading...
Advertisement

ही लक्झरी SUV फक्त 6.1 सेकंदात 0-100 kmph चा टॉप स्पीड पकडते. दुसरीकडे, तुम्ही ही कार 150 kW चे DC चार्जर वापरून अवघ्या अर्ध्या तासात 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकता. याशिवाय, जर तुमच्याकडे 50 kW चा DC चार्जर असेल, तर कार पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे दीड तासांचा वेळ लागू शकतो.

Advertisement

भारीच की.. BMW चीही येतेय ई-बाईक..! पहा 9 लाखांत काय मिळणार आहेत फीचर्स

Advertisement
Advertisement

Leave a Reply