Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आता अमेरिका आणि जर्मनीने रशियाला धमकावले.. ‘त्या’ मुद्द्यावर दोन्ही देश रशियाच्या विरोधात

नवी दिल्ली : अमेरिकेचा चीन बरोबरील तणाव कायम असताना आता रशिया विरोधातही तणाव वाढत चालला आहे. या तणावास युक्रेन कारणीभूत ठरत आहे. कारण, रशिया युक्रेनवर आक्रमण करण्याच्या तयारीत असल्याचा गुप्तचर संस्थांचा अहवाल आहे. त्यामुळे अमेरिकेने रशियाला धमकी दिली आहे. त्यानंतर रशियानेही अमेरिकेस जशास तसे उत्तर दिले होते. त्यापुढे आता अमेरिका आणि जर्मनी या दोन देशांनी मिळून रशियाला धमकावले आहे.

Advertisement

अमेरिका आणि जर्मनीने म्हटले आहे, की युक्रेनच्या बॉर्डरजवळ रशियाने सैन्य तैनात केल्याने युरोपीय सुरक्षेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेप केला तर त्याचे गंभीर परिणाम होतील. दोन्ही देशांच्या विदेश मंत्र्यांनी वॉशिंग्टनमधील बैठकीनंतर या महत्वाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली.

Advertisement

याआधी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले होते, की अमेरिकेने जर असे काही केले तर दोन्ही देशांतील संबंध पूर्णपणे समाप्त होतील. अमेरिकेने अतिरिक्त प्रतिबंध टाकण्याचा निर्णय घेतला तर याचे गंभीर परिणाम होतील. अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी युक्रेनला इशारा दिला आहे, की रशिया जानेवारीपर्यंत युक्रेनवर आक्रमण करण्याचा प्लान तयार करत आहे.

Advertisement

जो बायडेन आणि पुतिन यांच्यात युक्रेनसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. या दरम्यान दोघांनी रशियासोबतच्या धोरणात्मक संवादावरही चर्चा केली. बुधवारीच अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यांनी असेही सांगितले की बायडेन प्रशासन युरोपियन मित्र राष्ट्रांबरोबर राजनैतिक चर्चा सुरू ठेवणार आहे.

Loading...
Advertisement

अमेरिका आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात 10 जानेवारीपासून जिनिव्हा येथे चर्चा प्रस्तावित आहे. या महिन्यात दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली होती. या बैठकीत युक्रेन सीमेवरील वाढत्या तणावाच्या मुद्द्यावर युरोपमधील सुरक्षेबाबत चर्चा सुरू ठेवण्यासाठी दोन्ही नेत्यांनी दूत नियुक्त करण्याचे मान्य केले. सीमेवर 90 हजारांहून अधिक रशियन सैनिक जमा असल्याचा युक्रेनचा दावा आहे.

Advertisement

तसेच अनेक सैन्य उपकरणेही येथे तैनात केली गेली आहेत. त्यामुळे तणाव वाढला आहे. कोणत्याही क्षणी रशिया युक्रेनवर आक्रमण करील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रशियाने असे काही करू नये, यासाठी अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांकडून रशियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Advertisement

अमेरिका-रशियाच्या वादात चीनने घेतलीय एन्ट्री; ‘त्या’ मुद्द्यावर अमेरिकेला दिलाय गंभीर इशारा

Advertisement
Advertisement

Leave a Reply