कोरोनाच्या महत्वाच्या कामालाच खो..! ‘त्या’ 9 राज्यांना केंद्राने तातडीने धाडलेय पत्र; पहा, काय घडलाय प्रकार ?
नवी दिल्ली : देशभरात ओमिक्रॉनचे रुग्ण वेगाने वाढत असाताना केंद्राने नऊ राज्यांना महत्वाचे पत्र पाठवले आहे. कोरोना तपासण्या अत्यंत कमी वेगाने होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तामिळनाडू, पंजाब, ओडिशा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मिझोराम, मेघालय, जम्मू-काश्मीर आणि बिहार या राज्यांना हे पत्र लिहिले आहे.
या पत्रात असे म्हटले आहे, की राज्यांनी कोविड-19 तपासण्यांच्या संख्येत वाढ करावी. जेणेकरून संक्रमित व्यक्तीची ओळख होऊन त्याला वेगळे केले जाऊ शकते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांनी देशात कोरोनाचे वाढते रुग्ण आणि पॉजिटिविटी रेट वाढत असताना तपासण्या मात्र कमी होत आहेत, हे काळजी करण्यासारखे आहे असे सांगितले. पर्याप्त प्रमाण चाचण्या केल्या नाहीत तर संसर्गाची नेमकी पातळी निश्चित करणे कठीण आहे, असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉनला वेरिएंट ऑफ कन्सर्नच्या श्रेणीत ठेवले आहे, असे केंद्राने लिहिले आहे. अनेक देशांमध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात झालेले असूनही, कोविड-19 प्रकरणांमध्ये अतिरिक्त वाढ झाली आहे. त्यामुळेच कोरोनाच्या बाबतीत अत्यंत गांभीर्याची गरज आहे. केंद्राने म्हटले आहे की सर्व राज्यांनी तपासाला गती द्यावी आणि अधिकाधिक लोकांची तपासणी करावी आणि संसर्ग झालेल्यांना गर्दीत जाण्यापासून रोखावे, जेणेकरून संसर्गाचा वेग कमी करता येईल.
कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. बुधवारी कोरोनाचे सुमारे 58 हजार रुग्ण आढळले होते, मात्र बुधवारी देशभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला आणि 90 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. त्याच वेळी, गुरुवारी देशात ओमिक्रॉनच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आणि एका दिवसात सर्वाधिक 495 प्रकरणे नोंदवली गेली. त्यामुळे देशात ओमिक्रॉन संक्रमितांची संख्या 2630 वर पोहोचली आहे.