Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. जगातही कोरोना सुस्साट..! अमेरिका, ब्रिटेन, फ्रान्समध्ये सर्वाधिक रुग्ण; जाणून घ्या, अन्य देशातील परिस्थिती

नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूची विक्रमी प्रकरणे नोंदवली जात आहेत. Omicron प्रकारामुळे देशांना संसर्गाच्या लाटांचा सामना करावा लागत आहे. अमेरिका आणि ब्रिटनबरोबरच युरोपीय देश फ्रान्स, तुर्कीमध्येही परिस्थिती बिकट होत चालली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये, एका दिवसात 71,144 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

Advertisement

ब्रिटनमध्ये 1,94,747 नवीन प्रकरणे आणि 343 मृत्यूची नोंद झाली आहे. त्यानंतर एकूण रुग्णांची संख्या 13,835,334 झाली आहे. तर मृतांची एकूण संख्या 1,49,284 वर पोहोचली आहे आणि 10,567,672 लोक संसर्गातून बरे झाले आहेत. अमेरिकेत 24 तासांत 7,04,661 नवीन रुग्ण आढळले असून 1802 लोकांचा मृत्यू झाला आहे. आता येथे एकूण रुग्णांची संख्या 58,805,186 झाली आहे. दगावलेल्या रुग्णांची संख्या 8,53,612 झाली आहे आणि बरे झालेल्या रुग्णांची संख्या 41,999,896 झाली आहे.

Advertisement

फ्रान्समध्ये, एका दिवसात 332,252 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 246 मरण पावले आहेत. आता एकूण रुग्णांची संख्या 10,921,757 वर गेली आहे. एकूण मृत्यूंची संख्या 1,24,809 वर गेली आहे आणि एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5,162,757 वर गेली आहे. तर एक दिवस आधी मंगळवारी फ्रान्समध्ये 2,71,686 नवीन रुग्ण आढळले.

Loading...
Advertisement

चीनने आपली कोविड-झिरो आधिक कठोर केली आहे. काही प्रकरणे समोर आल्यानंतर दुसऱ्या शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. हाँगकाँगमध्येही नियम कडक करण्यात आले आहेत. पोर्टो रिकोमधील राज्यपालांनी बुधवारी जाहीर केले की, देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. सध्या देशात 36 टक्के पॉजिटिविटी रेट आहे. नवीन वर्षापासून बल्गेरियामध्ये ओमिक्रॉनची 12 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी कोरोनाचे सुमारे 1,900 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत तुर्कीमध्ये 66,467 नवीन संसर्गाची प्रकरणे आढळून आली आहेत, जी विक्रमी पातळीवर सर्वाधिक आहे.

Advertisement

राज्यात कोरोना सुस्साट..! आज सापडलेत तब्बल ‘इतके’ रुग्ण; अन्य राज्यांतही कोरोनाचा वेग वाढला..

Advertisement
Advertisement

Leave a Reply