Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

चीनचा धक्कादायक कारनामा..! भारता शेजारील ‘या’ देशात केलेय अतिक्रमण; पहा, नेमके काय घडलेय ?

नवी दिल्ली : विस्तारवादी चीनचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे. शेजारील देश नेपाळच्या बॉर्डरजवळ हुमला जिल्ह्यात चीनने घुसखोरी करत येथील काही ठिकाणी अतिक्रमण केले आहे. नेपाळ सरकारने नियुक्त केलेल्या समितीच्या चौकशी अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे. समितीच्या चौकशी अहवालात खुलासा झाल्यानंतरही नेपाळ सरकारने मौन बाळगल्याचे नेपाळी माध्यमांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर नेपाळी मीडियाने म्हटले आहे, की समितीने आपला तपास अहवाल अंतिम केला आहे. मात्र, सरकारने समितीचा अहवाल सार्वजनिक करण्यापासून रोखले आहे.

Advertisement

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नेपाळच्या हुमला जिल्ह्यातील सीमा भागात चीनकडून घुसखोरीचे प्रकरण समोर आले होते. नेपाळी मीडियानुसार, या घटनेनंतर सरकारने घुसखोरीच्या घटनेच्या चौकशीसाठी गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन केली होती. यानंतर समितीने हुमला आणि इतर सीमावर्ती जिल्ह्यांच्या परिस्थितीचा अभ्यास केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तपास समितीने सुरुवातीच्या टप्प्यात हे मान्य केले आहे की चीन आणि नेपाळच्या बॉर्डरवर परिस्थिती चांगली नाही.

Advertisement

सात सदस्यीय समितीचे सदस्य जय नारायण आचार्य म्हणाले की, आम्ही आमच्या अहवालात या प्रदेशातील भौगोलिक, सामाजिक-सांस्कृतिक आणि पायाभूत सुविधांचा समावेश केला आहे. ते म्हणाले, की हा अहवाल स्थानिक लोकांबरोबर झालेल्या संभाषणावर आधारित आहे. आम्ही परिसराची पाहणी केली असता हद्दीतील खांबांची दुरवस्था झाली असून तेथे तारांचे कुंपण करण्यात आले असल्याचे आढळून आले. या खांबांना तारेचे कुंपण कोणी केले आहे, हे माहीत नाही, असे ते म्हणाले. याची चौकशी करण्यासाठी संयुक्त चौकशी समिती स्थापन करण्याची शिफारस आम्ही केली असल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे, की नेपाळ सरकारने या प्रकरणी चीन बरोबर चर्चा केली आहे. मात्र, चीनने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.

Loading...
Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, समितीच्या चौकशी अहवालानुसार, हुमला जिल्ह्याच्या मुख्य जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीनंतर अहवाल देण्यास सांगितले होते. हा अहवाल नुकताच सार्वजनिक झाला आहे. मात्र, एका नेपाळी वृत्तपत्राने मुख्य जिल्हाधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, चीनच्या सीमेपासून एक किलोमीटर अंतरावर नेपाळच्या दिशेने घुसखोरी करताना हे अतिक्रमण करण्यात आले आहे. या खुलाशानंतर नेपाळमधील राजकारण चांगलेच तापले आहे.

Advertisement

नेपाळमध्ये वाढल्यात अडचणी; करोनानंतर ‘त्या’ संकटांपुढे हा देश झालाय हतबल

Advertisement
Advertisement

Leave a Reply