Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशियानेही अमेरिकेला दिलेय जशास तसे उत्तर; रशिया-अमेरिकेतील तणाव आणखी वाढणार

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार, या दरम्यान बायडेन यांनी पुतीन यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास किंवा युक्रेन बरोबरचा तणाव कमी न केल्यास अमेरिका आणि त्यांचे मित्र राष्ट्र निर्णायक उत्तर देतील. त्यानंतर आता रशियानेही अमेरिकेस जशास तसे उत्तर दिले आहे.
रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले, की अमेरिकेने जर असे काही केले तर दोन्ही देशांतील संबंध पूर्णपणे समाप्त होतील. अमेरिकेने अतिरिक्त प्रतिबंध टाकण्याचा निर्णय घेतला तर याचे गंभीर परिणाम होतील.

Advertisement

द्विपक्षीय धोरणात्मक स्थिरता चर्चा लवकरच सुरू होणार आहे. दोन्ही देशांमधील तणाव कमी झाल्यावरच या चर्चेत लक्षणीय प्रगती होऊ शकते. तणाव कायम असताना याबाबत ठोस निर्णय घेता येणे शक्य नाही.

Advertisement

अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी युक्रेनला इशारा दिला आहे, की रशिया जानेवारीपर्यंत युक्रेनवर आक्रमण करण्याचा प्लान तयार करत आहे. जो बायडेन आणि पुतिन यांच्यात युक्रेनसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. या दरम्यान दोघांनी रशियासोबतच्या धोरणात्मक संवादावरही चर्चा केली. बुधवारीच अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यांनी असेही सांगितले की बायडेन प्रशासन युरोपियन मित्र राष्ट्रांबरोबर राजनैतिक चर्चा सुरू ठेवणार आहे.

Loading...
Advertisement

अमेरिका आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात 10 जानेवारीपासून जिनिव्हा येथे चर्चा प्रस्तावित आहे. या महिन्यात दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली होती. या बैठकीत युक्रेन सीमेवरील वाढत्या तणावाच्या मुद्द्यावर युरोपमधील सुरक्षेबाबत चर्चा सुरू ठेवण्यासाठी दोन्ही नेत्यांनी दूत नियुक्त करण्याचे मान्य केले. सीमेवर 90 हजारांहून अधिक रशियन सैनिक जमा असल्याचा युक्रेनचा दावा आहे.

Advertisement

तसेच अनेक सैन्य उपकरणेही येथे तैनात केली गेली आहेत. त्यामुळे तणाव वाढला आहे. कोणत्याही क्षणी रशिया युक्रेनवर आक्रमण करील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रशियाने असे काही करू नये, यासाठी अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांकडून रशियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply