Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

..म्हणून भारताने पुन्हा अफगाणिस्तानला केलीय मदत; अफगाण लोकांना मिळालाय मोठा दिलासा

नवी दिल्ली : संकटाच्या काळात भारत नेहमीच अन्य देशांना मदत करण्यास तयार असतो. आताही कोरोनाचे संकट असताना भारताने अफगाणिस्तानला मदत केली आहे. भारताने या देशातील रुग्णालयास कोरोना प्रतिबंधक लसींचे 5 लाख डोस दान केले आहेत. तसेच पुढील सात दिवसांत आणखी 5 लाख लसी पाठवण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. भारत आणि अफगाणिस्तान विमान वाहतूक नसल्याने भारताने या लसी इराणच्या मदतीने अफगाणिस्तानमध्ये रवाना केल्या आहेत. याआधीही भारताने रुग्णालयात 1.6 टन जीवनरक्षक औषधे पाठवली होती, ज्याचे तालिबानने कौतुक केले होते.

Advertisement

परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, आज भारताने अफगाणिस्तानला कोविड-19 लसीचे (कोव्हॅक्सिन) 5 लाख डोस दिले आहेत. येत्या आठवड्यात अतिरिक्त 5 लाख डोस पुरवठा केला जाईल. 11 डिसेंबर रोजी, भारत सरकारने एका विशेष चार्टर फ्लाइटमध्ये 1.6 टन औषधे रवाना केली होती.

Advertisement

शनिवारी दिलेल्या लसींप्रमाणेच इतर औषधे जागतिक आरोग्य संघटनेद्वारे (WHO) पाठवण्यात आली. याशिवाय, पाकिस्तानने टाकलेल्या अटींमुळे अफगाणिस्तानला 50 हजार टन गहू अजूनही मिळालेले नाहीत. 3 डिसेंबर रोजी पाकिस्तानने सांगितले की ते अफगाण ट्रकमध्ये गहू आणि औषधे वाघा बॉर्डरमार्गे पाठवण्याची परवानगी देईल. परंतु, अद्याप याबाबत पूर्ण नियोजन झालेले नाही.

Loading...
Advertisement

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, भारत अफगाणिस्तानातील लोकांना अन्नधान्य, कोविड-19 लसींचे 10 लाख डोस आणि जीवनरक्षक औषधे मदत देण्यास वचनबद्ध आहे. मंत्रालयाने सांगितले, की येत्या काही आठवड्यात गहू आणि उर्वरित वैद्यकीय मदत देण्यात येईल.

Advertisement

बाब्बो.. अफगाणिस्तान मध्ये गरीबी आणि बेरोजगारी आणखी वाढणार; तालिबान्यांच्या ‘त्या’ घातक धोरणांचा इफेक्ट

Advertisement
Advertisement

Leave a Reply