Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

दिलासादायक.. ‘त्या’ देशात आता ओमिक्रॉन आलाय नियंत्रणात; पहा, काय आहे तेथील परिस्थिती

नवी दिल्ली : जगभरात सध्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने थैमान घातले आहे. अमेरिका, युरोपसह अन्य देशात रुग्ण वेगाने वाढत आहे. मात्र, ज्या दक्षिण आफ्रिकेत हा व्हेरिएंट सर्वात आधी सापडला होता. त्या देशात आता यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या देशात आता ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे, असे सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. रुग्ण संख्येत घट होत असल्याने सरकारने नाइट कर्फ्यूचे नियम आता मागे घेतले आहेत.

Advertisement

नोव्हेंबर महिन्यात या देशात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर येथे कठोर निर्बंध टाकण्यात आले. त्यानंतर महिन्याभरात हा व्हेरिएंर शंभरपेक्षा जास्त देशांमध्ये पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपातील देशात या व्हेरिएंटने थैमान घातले आहे. काल अमेरिकेत एकाच दिवसात सहा लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. अन्य देशांत ओमिक्रॉचा फैलाव वेगाने होत असताना दक्षिण आफ्रिकेत मात्र परिस्थिती आता नियंत्रणात आहे. त्यामुळे देशातील अन्य निर्बंधही आता शिथील केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा आणि ओमिक्रॉनबाबत संपूर्ण जगाला सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र, आता दक्षिण आफ्रिकेतील रुग्णसंख्येत घट होत आहे. देशातील सर्वच राज्यांत रुग्ण कमी होत आहेत. विशेष म्हणजे, दवाखान्यात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विशेष मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, कीडिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात आफ्रिकेत जवळपास 1 लाख 27 हजार 753 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर मात्र चौथ्या आठवड्यात रुग्णसंख्येत मोठी घट दिसून आली. या आठवड्यात 79 हजार रुग्ण आढळले होते.

Loading...
Advertisement

आता सध्याच्या परिस्थितीत देशातील नाइट कर्फ्यू मागे घेण्यात आला आहे. तसेच अन्य काही निर्बंधातही सरकारने सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र, रुग्णसंख्या पुन्हा वाढली तर निर्बंध कठोर करण्यात येतील, असा इशाराही दक्षिण आफ्रिका सरकारने दिला आहे.

Advertisement

देशात ओमिक्रॉनचा धोका वाढला.. सरकारनेही मान्य केलेय ‘ते’ वास्तव; पहा, काय म्हटलेय सरकारने

Advertisement
Advertisement

Leave a Reply