Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाने ‘तिथे’ उडालाय हाहाकार..! एकाच दिवसात तब्बल 6 लाख नवीन रुग्ण; नव्या वर्षातही संकट कायम

नवी दिल्ली : नव्या वर्षातही कोरोनाचे संकट कायम असून सातत्याने वाढत चालले आहे. अमेरिका आणि युरोपातील देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. निर्बंध कठोर केले तरी कोरोनाचा प्रसार थांबलेला नाही. अमेरिकेत तर सध्याच्या परिस्थितीत कोरोना आऊट ऑफ कंट्रोल आहे. कारण, देशात सलग तिसऱ्या दिवशी 5.80 लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. याआधीही ४.८८ लाख नवीन रुग्ण आढळले होते.

Advertisement

अमेरिकेत कोरोनाच्या नव्या लाटेमुळे संकट आणखीनच वाढले आहे. मोठ्या लोकसंख्येच्या लसीकरणानंतरही, नवीन रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. या संकटात एकमात्र दिलासा म्हणजे ओमिक्रॉन प्रकाराची प्रकरणे फारशी गंभीर नाहीत आणि डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत याचा त्रास झालेल्यांमध्ये धोका कमी आहे. ओमिक्रॉन संक्रमित रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्याची गरज शक्यतो पडत नाही, असे येथील आरोग्य विभागाने सांगतिले.

Advertisement

अमेरिकेत, ओमिक्रॉन प्रकाराचा धोका लक्षात घेऊन सरकारने लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. देशातील मोठ्या लोकसंख्येला पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. इतकेच नाही तर खबरदारी म्हणून अमेरिकेतील 1 हजारांपेक्षा जास्त विमान उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत. अमेरिकेशिवाय युरोपातील देशांमध्येही कोरोनाचे संकट वाढले आहे. फ्रान्स, ब्रिटन, इटलीसारख्या देशांमध्ये कोरोनाची नवी लाट थैमान घालत आहे.

Loading...
Advertisement

फ्रान्समध्ये एकाच दिवसात ओमिक्रॉन प्रकाराची 2.3 लाख नवीन प्रकरणे आढळून आली आहेत. देशात 1 लाखांहून अधिक नवीन प्रकरणे सातत्याने आढळून येत आहेत. शुक्रवारी 2.32 लाख नवीन प्रकरणे आढळून आली होती. जी एका दिवसात सापडलेल्या नवीन प्रकरणांची सर्वात मोठी संख्या आहे. याआधी बुधवारी देशात 2.8 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले होते. फ्रान्समध्ये, 62 टक्के नवीन प्रकरणे केवळ ओमिक्रॉन प्रकारात आढळतात.

Advertisement

कोरोना संकटामुळे इटली आणि ब्रिटनसारख्या देशांमध्येही स्थिती अत्यंत खराब आहे. शुक्रवारी इटलीमध्ये 1,44,243 नवीन रुग्ण आढळले. याआधी गुरुवारीही 1, 26, 888 प्रकरणे आढळून आली होती. याशिवाय ब्रिटनमध्येही संकट कायम आहे. शुक्रवारी देशात 1.89 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत.

Advertisement

बापरे.. आता या मोठ्या देशात ओमिक्रॉन होतोय ‘आऊट ऑफ कंट्रोल’; एकाच दिवसात रेकॉर्ड ब्रेक रुग्ण सापडले

Advertisement
Advertisement

Leave a Reply