Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

तालिबानबाबत चीनचा ‘तो’ प्लान अखेर फसलाच; तालिबानला पाठिंबा देणेही ठरले व्यर्थ

नवी दिल्ली : अफगाणिस्तान मध्ये तालिबानने कब्जा केल्यानंतर या तालिबानी राजवटीस पाठिंबा देण्यात चीन आणि पाकिस्तान हे देश आघाडीवर होते. जगातील कोणत्याही देशाने अद्याप तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाही. तालिबानचा इतिहास आणि मागील चार महिन्यांतील तालिबान्यांच्या कारवाया पाहता कोणताही देश या सरकारला मान्यता देण्यास तयार होणार नाही, हे नक्कीच. मात्र, हे माहित असतानाही आपला स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नात चीन आणि पाकिस्तानने प्रत्येक ठिकाणी तालिबानचे समर्थन केले. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर आता चीनला शहाणपण आले आहे.

Advertisement

तालिबानला पाठिंबा देण्यात किंवा या सरकारचे समर्थन करण्यात काहीच अर्थ नसल्याचे चीन सरकारच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच तर सध्या अफगाणिस्तामधील सध्याच्या परिस्थितीवर चीनच्या एका वरिष्ठ मंत्र्याने चिंता व्यक्त केली आहे. या देशात दहशतवादी संघटना आपले सामर्थ्यात वाढ करण्याच्या प्रयत्नात असल्याचे या मंत्र्याने म्हटले आहे.

Advertisement

एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे, की आता असे म्हणण्यास हरकत नाही की चीनला तालिबानला समर्थन देण्यात आपले काहीतरी चुकल्याचे लक्षात आले आहे. ऑगस्ट महिन्यात ज्यावेळी तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केला त्यावेळी सर्वात आधी चीन त्या ठिकाणी हजर होता. मात्र, आता चार महिन्यांनंतर चीन तालिबानवरील विश्वास गमावत चालला आहे.

Loading...
Advertisement

28 ऑक्टोबर रोजी चीनी विदेश मंत्रालयामे म्हटले होते, की अफगाणिस्तामध्ये बदललेल्या परिस्थितीमुळे क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय आतंकवाद विरोधी स्थिती आधिक जटील बनली आहे. दहशतवादी संघटनांकडून इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा होत असलेला वापर आता एक गंभीर समस्या बनला आहे.

Advertisement

चीनच्या मदतीने पाकिस्तानही झालाय शक्तिवान..! पहा नेमके काय केलेय दोघांनी मिळून

Advertisement

चीनचा नवा कारनामा..! फक्त 42 सेकंदात अमेरिकेला देऊ शकतो ‘असा’ झटका; पहा, काय केलेय चीनने ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply