चीनच्या मदतीने पाकिस्तानही झालाय शक्तिवान..! पहा नेमके काय केलेय दोघांनी मिळून
दिल्ली : भारताला सर्वात मोठा शत्रू मानणाऱ्या पाकिस्तान देशाने आता आपले सैन्य मजबूत करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. भारताने राफेल लढाऊ विमाने खरेदी केल्यानंतर आता पाकिस्तानने चीनकडून 25 J-10C लढाऊ विमाने खरेदी केली आहेत. ही लढाऊ विमाने सर्व प्रकारच्या हवामानात उड्डाण करण्यास सक्षम आहेत. चीनच्या सर्वोत्तम लढाऊ विमानांपैकी एक अशी त्यांची ओळख आहे. पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री शेख रशीद अहमद यांनी बुधवारी माहिती दिली की, 25 J-10C विमानांचा संपूर्ण ताफा पुढील वर्षी 23 मार्च रोजी पाकिस्तान दिनाच्या समारंभात भाग घेईल.
J-10C हे चीनमधील सर्वोत्तम लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. पाकिस्तानकडे आधीच अमेरिकेने बनवलेली F-16 श्रेणीची लढाऊ विमाने आहेत. त्याच वेळी, पाकिस्तानला जे-10 सी आपले सर्वात विश्वसनीय लढाऊ विमान दिल्यानंतर चीन एक प्रमुख मित्र बनला आहे. पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री शेख रशीद अहमद म्हणाले की, पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच 23 मार्च रोजी व्हीआयपी पाहुणे समारंभात सहभागी होण्यासाठी येत आहेत. J-10C चा फ्लाय पास्ट सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पाकिस्तानचे हवाई दल चीनच्या जेएसला उड्डाण करणार आहे. ते म्हणाले की चीनची 25 J-10C लढाऊ विमाने भारताच्या राफेलला उत्तर आहेत.
- Omicron India Live : मुंबईत लागू झालाय ‘तो’ निर्णय; पहा कुठे काय आहे स्थिती
- कोरोना कायम असतानाही विदेशातील गुंतवणूक वाढणार; जाणून घ्या, कुणी व्यक्त केलाय ‘हा’ अंदाज