Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

चीनचा नवा कारनामा..! फक्त 42 सेकंदात अमेरिकेला देऊ शकतो ‘असा’ झटका; पहा, काय केलेय चीनने ?

नवी दिल्ली : चीनचे कारनामे नेहमीच जगासाठी डोकेदुखी ठरत असतात. हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांची चाचणी करुन खळबळ उडवून दिल्यानंतर आता चीन आणखी एका कारनाम्याने चर्चेत आला आहे. चीनचा दावा आहे की त्याचा उपग्रह काही सेकंदात अमेरिकेतील कोणत्याही शहराचे फोटो घेऊ शकतो. चीनचा बीजिंग-3 उपग्रह अंतराळातून कोणत्याही अमेरिकन शहरांची अतिशय स्पष्ट फोटो घेऊ शकतो. चीनच्या या कृत्यामुळे अमेरिकेची डोकेदुखीत वाढ होणार आहे.
अमेरिकेनेही चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. एका सॉफ्टवेअरच्या मदतीने अमेरिका चीनवर नजर ठेवणार आहे.

Advertisement

चिनी शास्त्रज्ञांनी सांगितले की बीजिंग-3, जूनमध्ये प्रक्षेपित केलेल्या एक टन वजनाच्या व्यावसायिक उपग्रहाने सॅन फ्रान्सिस्को खाडीच्या मुख्य क्षेत्राचे सखोल मूल्यांकन पूर्ण केले. त्यांनी दावा केला, की या उपग्रहाने एका अमेरिकन शहरा भोवतीच्या मोठ्या क्षेत्राची केवळ 42 सेकंदात फोटो घेतले. स्पुतनिकने साउथ चायना मॉर्निंग पोस्टचा हवाला देत सांगितले की, रस्त्यावरील कोणतेही लष्करी वाहन ओळखण्यासाठी आणि वाहनात कोणत्या प्रकारची शस्त्रे आहेत हे जाणून घेण्यासाठी हे फोटो पुरेसे आहेत.

Advertisement

हे फोटो 500 किमी अंतरावरुन घेतल्या गेले होते आणि त्यांचे रिझोल्यूशन 50 सेंटीमीटर प्रति पिक्सेल होते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, उपग्रहाच्या कार्यक्षमतेच्या चाचणीत असे आढळून आले, की तो 10 अंश प्रति सेकंदाच्या वेगाने फिरताना फोटो घेऊ शकतो. हा असा वेग आहे जो यापूर्वी कोणत्याही उपग्रहावर दिसला नव्हता. संशोधन संघाने उपग्रह आणि फोटो ज्या वेगाने टिपले गेले त्याबद्दल एक लेख देखील लिहिला होता, जो या महिन्याच्या सुरुवातीला स्पेसक्राफ्ट इंजिनियरिंग या चिनी जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता. एक प्रमुख संशोधक, यांग फेंग यांनी सांगितले की, वेगवान उपग्रह तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीनने थोडा उशीर केला, परंतु कमी कालावधीत बरीच प्रगती केली.

Loading...
Advertisement

लहान आकारमान आणि माफक किंमत असूनही, बीजिंग-3 हा वेगाच्या दृष्टीने सर्वात आघाडीवरील उपग्रह मानला जातो आणि संशोधनानुसार तो आतापर्यंत तयार केलेल्या सर्वात शक्तिशाली पृथ्वी निरीक्षण उपग्रहांपैकी एक असू शकतो. जगभरातील 500 ‘महत्त्वाच्या’ ठिकाणांवर दररोज सुमारे 100 भेटी देऊन निरीक्षण करण्याचा दावा केला गेला आहे. उपग्रह विशिष्ट लक्ष्याची उपस्थिती देखील ओळखू शकतो आणि जमिनीवरील नियंत्रण पथकाला त्याचे फोटो पाठवू शकतो.

Advertisement

आता रशिया आक्रमक..! ‘त्या’ मुद्द्यावर अमेरिका आणि ‘नाटो’ ला दिलाय गंभीर इशारा..

Advertisement

.. म्हणून चीन-रशियावर अमेरिकेची राहणार नजर; अमेरिकी सरकारने घेतलाय मोठा निर्णय; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply