Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाने उडालाय हाहाकार..! अमेरिकेत रेकॉर्ड मोडले, फ्रान्समध्ये 2 लाखांपेक्षा जास्त रुग्ण..

नवी दिल्ली : जगभरात एका आठवड्यात कोरोनाचे विक्रमी रुग्ण नोंदवले गेले आहेत. ओमिक्रॉनमुळे अनेक देशांमध्ये प्रचंड वेगाने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे आणि 22 ते 28 डिसेंबर दरम्यान मागील आठवड्याच्या तुलनेत 37 टक्के अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, असे राष्ट्रीय डेटाबेसवर आधारित AFP वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

Advertisement

22 ते 28 डिसेंबर दरम्यान एकूण 6.55 दशलक्ष प्रकरणे नोंदवली गेली, जे मार्च 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने साथीचा रोग घोषित केल्यापासून सर्वाधिक आहे. व्हायरसचे सर्वात मोठे संकट सध्या युरोपमध्ये पाहायला मिळत आहे. एएफपीच्या म्हणण्यानुसार, कोरोनाने युरोपमध्ये पुन्हा एकदा हाहाकार उडाला आहे. त्यामुळे सरकारांना पुन्हा निर्बंध जारी करणे भाग पाडले आहे. युरोपमध्ये गेल्या सात दिवसांत 3.5 दशलक्षाहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ब्रिटन, फ्रान्स, ग्रीस आणि पोर्तुगाल या सर्व देशांमध्ये दररोज सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत.

Advertisement

युरोपीय देश फ्रान्समध्ये मागील 24 तासांत कोरोनाचे दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. आरोग्य मंत्री ऑलिव्हियर व्हेरन यांनी बुधवारी सांगितले, की हा एक नवीन दैनिक रेकॉर्ड आहे. मंगळवारी 1,79,807 प्रकरणे नोंदवण्यात आली होती. मात्र, बुधवारी हा आकडा 2,08,000 वर पोहोचला. वाढती रुग्णसंख्या पाहता फ्रान्स सरकारने देशभरात काही निर्बंध नव्याने जारी केले आहेत.

Loading...
Advertisement

मंगळवारी, अमेरिकेमध्ये 2,65,427 नवीन कोविड -19 प्रकरणे नोंदवली गेली. या नवीन प्रकरणांनी अमेरिकेमधील दैनंदिन 2,52,000 प्रकरणांचा पूर्वीचा विक्रम मोडला. सुमारे एक वर्षापूर्वी 11 जानेवारी रोजी 2,52,000 प्रकरणे नोंदवली गेली होती. मात्र मंगळवारी 2,65,427 नवीन रुग्णांनी जुना रेकॉर्ड मोडला. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यापासून अमेरिका आणि जगभरात संक्रमण वेगाने पसरत असताना हे नवे रेकॉर्ड आहे.

Advertisement

कोरोना अपडेट : ओमिक्रॉनचा वेग वाढला..! आज देशात सापडलेत ‘इतके’ रुग्ण; पहा, काय आहे राज्यांत परिस्थिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply