Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. पाकिस्तान ‘त्या’ परीक्षेतही ठरलाय फेल; दक्षिण आशियात ‘त्या’ बाबतीत पाकिस्तान सर्वात मागे

नवी दिल्ली : दहशतवादास खतपाणी घालून त्यास संरक्षण देणाऱ्या पाकिस्तान बाबत आणखी एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. पाकिस्तान मध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. एक तर हा देश प्रचंड कर्जात आहे. आधीच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पुन्हा कर्ज घ्यावे लागत आहे, अशी येथील परिस्थिती आहे. गरीबी, बेरोजगारी, दुष्काळ, महागाई या समस्यांनी विक्राळ रुप धारण केले आहे. भ्रष्टाचार वाढला असून या समस्या रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचे येथील राज्यकर्तेच सांगत आहेत. आता तर लोकांना चांगले शिक्षण देण्यातही पाकिस्तान पूर्ण अपयशी ठरल्याचे समोर आले आहे.

Advertisement

देशात कमी साक्षरता दर, खराब रोजगारांचे प्रशिक्षण आणि शिक्षण क्षेत्रात कमी गुंतवणूक या कारणांमुळे येथील शिक्षण क्षेत्र कमजोर ठरले आहे. नाविण्यपूर्ण शिक्षणाचा तर प्रचंड दुष्काळ निर्माण झाला आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सने 2021 मध्ये पाकिस्तानला 132 अर्थव्यवस्थांच्या यादीत 99 वा क्रमांक दिला आहे. पाकिस्तानचा साक्षरता दर अत्यंत खराब आहे. यामुळे संशोधन आणि शिक्षणाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण गुंतवणूकीचा अभाव आहे. पाकिस्तानचा शिक्षणावरील खर्च देशाच्या एकूण जीडीपीच्या फक्त 2.9 टक्के आहे.

Advertisement

‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’च्या अहवालानुसार, दक्षिण आशिया आणि संपूर्ण आशियामध्ये साक्षरतेचे प्रमाण पाकिस्तानमध्ये सर्वात कमी आहे. देशाचा साक्षरता दर 62.3 टक्के आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानच्याच एका अहवालात असे म्हटले, आहे की कमी साक्षरता असलेल्या व्यक्ती श्रमिक बाजार, शिक्षण आणि रोजगारप्रशिक्षणासाठी तयार नसतात. इनोव्हेशन रँकिंग 82 वेगवेगळ्या निर्देशकांवर आधारीत आहे. ह्युमन कॅपिटल आणि रिसर्च इंडिकेटरमध्ये पाकिस्तान 117 व्या क्रमांकावर आहे.

Advertisement

स्वीडन आणि अमेरिका हे या क्रमवारीत आघाडीवरील देश आहेत. आशियातील देशांच्या संदर्भात व्हिएतनाम 44, भारत 46 व्या क्रमांकावर आहे. ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’च्या मते, कमी-मध्यम उत्पन्न गटातील अर्थव्यवस्थांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि मध्य आणि दक्षिण आशियामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

Advertisement

अरेरे.. पाकिस्तान ‘त्यामध्ये’ सुद्धा ठरलाय सपशेल अपयशी; कोरोना संकटाचा बसलाय जोरदार फटका

Advertisement
Advertisement

Leave a Reply