Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

जगात कोरोनाचे थैमान पण, ‘या’ 12 देशांमध्ये कोरोना गायब; कारण ऐकून वाटेल आश्चर्य..!

नवी दिल्ली : कोरोना या घातक आजाराने जगभरात मोठे नुकसान केले आहे. दोन वर्षांनंतरही या आजाराचा धोका कमी झालेला नाही. आता तर नव्या व्हेरिएंटन दहशत निर्माण केली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटने युरोप आणि आफ्रिकेतील देशांमध्ये थैमान घातले आहे. डेल्टा प्रमाणेच या व्हेरिएंट सुद्धा त्रासदायक ठरत आहे. अशी परिस्थिती असताना जगात असेही काही देश आहेत जेथे कोरोनावर पूर्ण नियंत्रण मिळाले आहे. या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण नाहीत म्हटले तरी चालेल, अशी परिस्थिती आहे. होय हे खरे आहे.

Advertisement

जगात 12 देश असे आहेत की ज्यांनी सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे अत्यंत कठोर पालन केले त्याचा परिणाम म्हणून या देशांनी कोरोनाला रोखण्यात यश मिळवले आहे. या देशांमध्ये कोरोनाची शून्य प्रकरणे नोंदवली जात आहेत, परंतु काही प्रकरणे यापूर्वी येथे आली असावीत, हे नाकारता येत नाही. कारण उत्तर कोरिया आणि तुर्कमेनिस्तान सारखे आरोग्याबाबत माहिती योग्यपणे आंतरराष्ट्रीय संस्थांना देत नाहीत, हे सुद्धा खरे आहे.

Advertisement

मायक्रोनेशिया 600 पेक्षा जास्त बेटांनी बनलेला आहे. WHO च्या म्हणण्यानुसार, येथे कोरोनाचे एकही प्रकरण आलेले नाही. अमेरिका, चीन आणि जपानने देखील कोरोना साथीच्या आजाराच्या वेळी मायक्रोनेशियाला मदत केली.

Advertisement

किरिबाटी हा 32 बेटांचा समावेश असलेला लहान देश आहे. किरिबाटी हा प्रवास निर्बंध लादणाऱ्या सर्वात आधीच्या देशांपैकी एक होता. यामुळे काही मोजक्याच विमान कंपन्या या दुर्गम देशात प्रवास करतात.

Loading...
Advertisement

नाउरु हा आकाराने जगातील तिसरा सर्वात लहान देश आहे. या देशाची लोकसंख्या दहा हजारांच्या आसपास आहे. नाउरुने आतापर्यंत शेजारील देश किरिबाटीप्रमाणेच प्रवास निर्बंधांद्वारे कोरोना विषाणूवर मात केली आहे.

Advertisement

उत्तर कोरियाची बॉर्डर चीन आणि दक्षिण कोरिया बरोबर आहे. त्यामुळेच येथे कोरोनाचा एकही रुग्ण आढळून येणे अशक्य असल्याचे अनेकांचे मत आहे. पण उत्तर कोरियाने अधिकृतपणे एकाही कोरोना प्रकरणाची माहिती दिलेली नाही. उत्तर कोरियाने कडक लॉकडाउन आणि प्रवास निर्बंध लागू केले आहेत. त्याच वेळी, देशाच्या बॉर्डर सुद्धा बंद केल्या आहेत.

Advertisement

याव्यतिरिक्त नियू, पिटेकर्न, सेंट हेलेना, तोकेलाऊ, टोंगा, तुर्कमेनिस्तान, तुवालू या देशांनीही कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. या देशांनी कोरोना नियमांचे कठोर पालन केले त्यामुळे आज येथे या आजाराचे कोणतेही टेन्शन राहिलेले नाही.

Advertisement

ओमिक्रॉनचा धोका : ब्रिटनमध्ये एकाच दिवसात नवीन प्रकारची प्रकरणे झाली तिप्पट

Advertisement
Advertisement

Leave a Reply