Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. बातमी ऐकून होईल आश्चर्य; ‘त्या’ ग्रहावर सापडलयं की पाणी; पहा, शास्त्रज्ञांनी काय केलाय दावा ?

नवी दिल्ली : भविष्यात पृथ्वीवर राहणे धोक्याचे ठरले तर कोणता ग्रह राहण्यासाठी योग्य आहे, याचा शोध अनेक वर्षांपासून घेतला जात आहे. मात्र, माणसांच्या राहण्यास योग्य असा दुसरा ग्रह अजून तरी मिळालेला नाही. तरी सुद्धा हार न मानता अंतराळ संस्था या शोधकार्यात आहेत. अंतराळ मोहिमांसाठी अब्जावधींचा खर्च यासाठीच तर केला जात आहे.

Advertisement

मंगळ आणि शुक्र या दोन ग्रहांवरच जीवसृष्टीचा शोध घेण्याचे सर्वाधिक प्रयत्न होत आहेत. शुक्र ग्रहाचे तापमान फार जास्त आहे, त्यामुळे येथे जीवन असण्याची शक्यता तशी फारच कमी आहे. तरी देखील शास्त्रज्ञ या ग्रहाचा अभ्यास करत असतात. त्यानंतर मंगळच हा असा ग्रह आहे की ज्याठिकाणी जीवसृष्टीचा शोध वेगाने घेतला जात आहे. अमेरिकेसह अन्य काही देशांनी यासाठी खास अंतराळ मोहिमा सुरू केल्या आहेत. आता या मंगळ ग्रहाबाबत शास्त्रज्ञांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. ज्यामुळे मंगळ हा भविष्यात कधीतरी राहण्यायोग्य होईल, असे पुन्हा वाटू लागले आहे.

Advertisement

मंगळ ग्रहाच्या ग्रॅन कॅनयनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आढळून आल्याची माहिती युरोपीय अंतराळ संस्थांनी दिली आहे. या संस्थांच्या म्हणण्यानुसार मंगळ ग्रहावर पाण्याचा मोठा साठा आहे. मंगळ ग्रहाच्या वल्लेस मरीनर्स घाट परिसराच्या फक्त तीन फूट खाली पाण्याचा साठा आहे. वल्लेस मरीनर्स हा 3 हजार 862 किलोमीटर परिसरात पसरलेला मोठा घाट आहे. या घाटात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा असल्याचे शास्त्रज्ञांना अपेक्षित आहे. या घाटाच्या परिसरात मध्यभागी पाणी आहे, असे एका संशोधनातून समोर आले आहे. याठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त पाणी असल्याचे सांगण्यात आले. कमी तापमानामुळे येथील जमिनीखाली बर्फ जमा झाला आहे.

Loading...
Advertisement

याआधी सन 2006 मध्ये अमेरिकेच्या नासा अंतराळ संस्थेने काही फोटो प्रसिद्ध केले होते. त्यावेळी मंगळ ग्रहावर पाणी असल्याचे पुरावे मिळाले आहेत, असे सांगितले होते. मंगळावर काही प्रमाणात कोरडवाहू जमीन आणि नदीचे घाट दिसून येतात. त्यावरुन तेथे पाणी असल्याचा अंदाज लावता येऊ शकतो. आतापर्यंत या ग्रहावर जे पाणी दिसून आले ते बर्फ स्वरुपात होते.

Advertisement

बाब्बो.. आकडा पाहून आकडी येईल की; फ़क़्त एक किलो माती पडणार ९ अब्ज डॉलर्सना..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply