बाब्बो.. कोरोनाने अवघ्या जगाचे केलेय इतके मोठे नुकसान; 1930 नंतर प्रथमच घडतेय ‘असे’ काही; पहा, कुणी केलाय ‘हा’ खुलासा
मुंबई : जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक बँक यांनी कोरोनाबाबत एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोरोनाने जगभरात किती नुकसान केले, याबाबत अहवालात खुलासा करण्यात आला आहे. कोरोनाचे संकट जगासाठी अभूतपूर्व असेच होते. याआधीही अनेक संकटे आली मात्र, त्या संकटांनी इतके नुकसान केले नाही जितके एकट्या कोरोनाने केले. फक्त आरोग्यच नाही, तर संपूर्ण जग वीस वर्षे मागे गेले आहे.
कोरोनाने सर्वसामान्यांचेही प्रचंड आर्थिक नुकसान केले. आर्थिक अडचणी उभ्या राहिल्याने त्यांना आता आरोग्याचा खर्च करणेही शक्य राहिलेले नाही.
या दोन्ही संघटनांच्या अहवालात म्हटले आहे, की कोरोनाच्या संकटाने 1930 च्या दशकानंतर प्रथमच अतिशय खराब आर्थिक संकट निर्माण केले आहे. कोरोनास रोखण्यासाठी लोकांनी पैसे खर्च केले त्यामुळे ते आता गरीबीकडे ढकलले गेले आहेत. या आजाराने सर्वसामान्य लोक दुहेरी संकटात अडकले आहेत. पहिले म्हणजे, आरोग्याचे मोठे नुकसान झाले आणि दुसरे म्हणजे या लोकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली. या काळात लोकांनी औषधे आणि अन्य आवश्यक आरोग्य सुविधांसाठी जे पैसे खर्च केले आहेत, त्यामुळे जगातील तब्बल अर्धा अब्ज लोकांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
कोरोनामुळे अन्य आजारांना रोखण्यासाठी जी तयारी केली जात आहे, त्यामध्ये अनेक कमतरता राहिल्या आहेत. त्यामुळे अन्य आजारांशी संबंधित लसीकरणात मागील दहा वर्षात प्रथमच मोठी घट झाली आहे. त्यामुळे टीबी आणि मलेरिया या घातक आजारांचा धोका वाढला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे महानिदेशक डॉ. टेड्रोस घेब्रेयेस यांनी सांगितले, की प्रत्येक देशाच्या सरकारने लोकांना आरोग्याच्या बाबतीत काही अडचणी येणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्यासंबंधित सुविधांसाठी होणारा खर्च आधिक मजबूत करणे सुद्धा गरजेचे आहे. आरोग्य व्यवस्था अशा पद्धतीने तयार करावी लागेल की भविष्यात अशा घातक आजारांना रोखण्यास सक्षम असेल.
बापरे.. ‘त्या’ 27 जिल्ह्यांमुळे वाढले केंद्र सरकारचे टेन्शन; पहा, तिथे काय आहे कोरोनाची परिस्थिती