Take a fresh look at your lifestyle.

अबब… पाकिस्तानात चाललेय काय? नागरिकांना मिळेना साधे गव्हाचे पिठ.. काय आहे प्रकरण

नवी दिल्ली : भीषण आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानमध्ये आणखी एक संकट निर्माण झाले आहे. त्यांच्या पंजाब प्रांतात गव्हाच्या पिठाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.

Advertisement

पंजाब प्रांताच्या अन्न विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये गव्हाच्या पिठाचा साठा संपला आहे. नवीन पीक येण्यास चार-पाच महिन्यांचा विलंब होत आहे. एएनआयच्या वृत्तानुसार पाकिस्तानची ही स्थिती गव्हाचे उत्पादन वाढवण्यात अपयश, खरेदीमध्ये सरकारी पातळीवरील भ्रष्टाचार, साठा व्यवस्थापन आणि साठवणुकीतील त्रुटींमुळे झाली आहे.

Advertisement

पंजाब प्रांतातील पीठ गिरणी मालक त्यांच्या गिरण्या बंद करत आहेत. गव्हाच्या टंचाईमुळे त्यांना इतर जिल्ह्यातून शासकीय गहू खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे मालवाहतुकीचे शुल्क जास्त आहे. त्याचवेळी गव्हाखालील क्षेत्र वाढवून शेतकऱ्यांना सवलती दिल्याशिवाय पिठाचे संकट दूर होणे अवघड असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गव्हाच्या टंचाईला अन्न विभागाचा खरेदी आणि इतर खर्चातील भ्रष्टाचारही कारणीभूत आहे.

Advertisement

पाकिस्तानातील ‘द न्यूज इंटरनॅशनल’ या वृत्तपत्राने कृषी तज्ज्ञांच्या हवाल्याने म्हटले आहे की, शेतकऱ्यांना अनुदान दिल्याशिवाय पीठाच्या संकटावर मात करणे शक्य नाही. गव्हाच्या साठवणुकीसाठी अन्न विभागाकडून करण्यात येत असलेल्या गोणी खरेदी व इतर खर्चातही भ्रष्टाचार होत आहे.

Advertisement

संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना, जागतिक बँक आणि आशियाई विकास बँक गेल्या अनेक वर्षांपासून इम्रान खान यांच्या सरकारला पाकिस्तानमधील पिठाच्या संकटावर इशारा देत आहेत. राष्ट्रीय तिजोरीवर बोजा पडू नये म्हणून अन्न व बाजार समित्या रद्द कराव्यात, असे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे इम्रान सरकारने देशातील उद्योगपतींचा विश्वास गमावला आहे. तिला देशातील चिनी उद्योगपतींना प्रोत्साहन द्यायचे आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply