नवी दिल्ली : अफगाणिस्तान मधील तालिबान सरकारला अमेरिकेसह अन्य देशांनी अजूनही मान्यता दिलेली नाही. अफगाण सरकारच्या संपत्तीवरही निर्बंध आहेत. या परिस्थितीत काही देश आर्थिक मदत देण्यास तयार आहेत मात्र त्यांच्या काही अटी आहेत. या अटी पूर्ण करणे तालिबानला शक्य नाही. त्यामुळे तालिबान सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत मात्र ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी वेगळेच विधान केले आहे.
त्यांच्या या वक्तव्यामुळे तालिबान्यांना मदत होणार असली तरी जगातील देशांना मात्र हे अनपेक्षित आहे. जॉन्सन म्हणाले, की अफगाणिस्तान मधील लोकांना या संकटाच्या काळात मदत करायची असेल तर तालिबान सरकारला बरोबर घेऊन कामकाज करावे लागेल, त्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नाही. याबाबत त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी हे विधान केले.
ते पुढे म्हणाले, की अफगाणिस्तान मधील लोकांना मदत करण्यासाठी ब्रिटेनला आता तालिबान सरकारची मदत घ्यावी लागणार आहे. अफगाणिस्तान मधील परिस्थिती सातत्याने खराब होत आहे. त्यामुळे येथील लोकांना लवकरात लवकर मदत मिळणे गरजेचे आहे. पण हे तालिबान सरकारचे सहकार्य मिळाल्याशिवाय आजिबात शक्य नाही. त्यामुळे तालिबान सरकारचे सहकार्य घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
सध्याच्या परिस्थितीत अफगाणिस्तान मध्ये कोणतेही नेतृत्व नसले तर सरकार आहे. त्यामुळे ब्रिटनला या सरकारचे सहकार्य घ्यावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितले. जॉन्सन यांच्या या विधानाचे तालिबान सरकारनेही स्वागत केले आहे. या मुद्द्यावर अमेरिकेने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. या प्रकरणी अमेरिकेचे काय धोरण असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण, ब्रिटेन आणि अमेरिका मित्र देश आहेत.
तालिबान्यांकडे पडलाय ‘त्याचा’ दुष्काळ; ‘तो’ निर्णय घेण्यासाठी अमेरिकेला म्हटलेय असे काही..
तालिबानसाठी पाकिस्तानने केलाय ‘हा’ नवा प्लान; चीनही करतोय मदत; पहा, काय सुरू आहे राजकारण