अरे बापरे.. ‘त्या’ 43 देशांत आलेय ‘हे’ नवे संकट; पहा, संयुक्त राष्ट्रांनी काय दिलाय इशारा
नवी दिल्ली : जगासाठी सध्याचा काळ संकटांचा आहे. कोरोनानंतर अनेक संकटे आली. आताही जगातील कोट्यावधी लोकांना एका नव्या संकटाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जगात काही ठिकाणी भीषण दुष्काळाचे संकट निर्माण होण्याची शक्यता असून या संकटाचा तब्बल 43 देशांतील साडेचार कोटी लोकांना फटका बसण्याची शक्यता आहे. जागतिक खाद्य अभियानाने याबाबत इशारा दिला आहे, की जगातील 43 देशांत सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
जगात सध्या खाद्यान्नाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. कोट्यावधी लोकांना दोन वेळचे अन्न सुद्धा मिळत नाही. परिस्थिती सातत्याने खराब होत आहे. 2019 मध्ये ही संख्या 2 कोटी 70 लाख होती. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीस यामध्ये वाढ होऊन आता हा आकडा 4 कोटी 20 लाखांपर्यंत पोहोचला आहे. उपासमारीच्या या संकटाचा सर्वाधिक फटका अफगाणिस्तान, अंगोला, सोमालिया, हैती, इथिओपिया या देशांना बसला आहे. या देशात उपासमारीचे संकट वेगाने वाढत चालले आहे.
संघटनेचे कार्यकारी निदेशक डेव्हीड बीजली यांनी सांगितले, की करोडो लोकांसमोर हे संकट निर्माण झाले आहे. सध्या आपल्यासमोर कोरोना प्रमाणेच हवामान बदल, संघर्ष, हिंसा आणि युद्ध अशी संकटे समोर आहेत. उपासमारीचे संकट सातत्याने वाढत चालले आहे. जगातील साडेचार कोटींपेक्षा जास्त लोक या संकटाकडे ओढले जात आहेत.
दुष्काळाचे संकट टाळायचे असेल तर किमान सात अब्ज डॉलर्स निधी तातडीने आवश्यक आहे, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या खाद्य संस्थेने व्यक्त केला आहे. संकटग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी आधिक आर्थिक मदतीची गरज आहे. त्यासाठी जगभरातील अन्य देशांनीही मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
.. तर ‘त्या’ 10 लाख मुलांची होईल उपासमार; पहा, कुणी दिलाय ‘हा’ गंभीर इशारा
तर ‘त्या’ ४ कोटी लोकांची होईल उपासमार; पहा, कोणी दिलाय ‘हा’ गंभीर इशारा