Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

टी 20 विश्वचषक : पाकिस्तानच्या `या` क्रिकेटरने मागितली देशवासीयांची माफी

दुबई : टी २० विश्वचषकाच्या फायनलमध्ये मॅथ्यू वेडचा झेल सोडणे पाकिस्तानला जड गेले आणि त्यानंतर वेडने सलग तीन चेंडूंत षटकार ठोकून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. यानंतर हसन अली आणि त्याच्या पत्नीला पाकिस्तानमध्ये प्रचंड ट्रोल केले जाऊ लागले.

Advertisement

टी २० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात पाक गोलंदाज हसन अलीने मॅथ्यू वेडचा झेल सोडला. तसेच खराब गोलंदाजी केली. हसनने आता याबद्दल माफी मागितली आहे. त्यांनी ती सोशल मीडियावर पोस्टही केली आहे.

Advertisement

मॅथ्यू वेडचा झेल सोडणे पाकिस्तानला जड गेले आणि त्यानंतर वेडने सलग तीन चेंडूंत षटकार ठोकून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. यानंतर हसन अली आणि त्याच्या पत्नीला पाकिस्तानमध्ये प्रचंड ट्रोल केले जाऊ लागले. त्याला धमक्याही दिल्या होत्या. आता हसन अलीने आपल्या चुकीबद्दल पाकिस्तान क्रिकेटप्रेमींची माफी मागितली आहे.

Loading...
Advertisement

हसनने सोशल मीडियावर लिहिले, मला माहित आहे की तुम्ही लोक माझ्याबद्दल खूप निराश आहात. कारण मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. परंतु, माझ्यापेक्षा क्वचितच कोणी दुःखी असेल. माझ्याकडून तुमच्या अपेक्षा आहेत म्हणून निराश होऊ नका. मला माझ्या देशाची सेवा करायची आहे. मी पुन्हा मेहनत करत आहे. मी तुमच्यासमोर आणखी मजबूत येईन. तुमच्या संदेश आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. मला त्याची खूप गरज होती.

Advertisement

हसनची पत्नी सामिया ही भारताची आहे. ट्रोलर्सने हसन आणि त्याच्या पत्नीला जोरदार ट्रोल केले. हसनला तर पाकिस्तानात ‘देशद्रोही’ म्हटले जात होते. काहींनी तर ट्विट करून हसनला येताच गोळ्या घाला, असे म्हटले होते. सामिया ही भारतातील हरियाणातील नूह जिल्ह्यातील चंदेनी गावची रहिवासी आहे. ती एमिरेट्स एअरलाइन्समध्ये फ्लाइट इंजिनिअर आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply