Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

टी २० विश्वचषक : सेमी फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव मात्र एका खेळाडूने केला अनोखा विक्रम

दुबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला आणि त्यांचे टी २० विश्वचषकाच्या फायनलमध्ये जाण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. पाकचा पराभव झाला असला तरी त्यांच्या एका फलंदाजाने एक अनोखा विक्रम केला आहे.

Advertisement

पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने २०२१ च्या टी २० विश्वचषकात इतिहास रचला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 67 धावा केल्या आणि यावर्षी त्याच्या 1000 टी-20 धावा पूर्ण केल्या. एका वर्षात 1000 T 20 प्रकारात धावा करणारा रिझवान हा जगातील पहिला फलंदाज आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने यावर्षी टी-20 मध्ये 826 धावा केल्या आहेत. यावर्षी बाबर आणि रिझवानची जोडी जबरदस्त फॉर्ममध्ये असून या दोघांनीही अनेक विक्रम केले आहेत.

Advertisement

रिझवानने यावर्षी 23 टी-20 सामने खेळले असून त्याला फक्त 20 वेळा फलंदाजीची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने 86.08 च्या सरासरीने एकूण 1033 धावा केल्या आहेत आणि 10 अर्धशतकांसह शतकही केले आहे. एका वर्षात 1000 पेक्षा जास्त टी-20 धावा करणारा रिझवान हा एकमेव फलंदाज आहे.

Loading...
Advertisement

बाबर-रिझवान जोडी सर्वात यशस्वी : बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात ७१ धावांची भागीदारी केली. यासोबतच या स्पर्धेत दोघांनी मिळून ४०२ धावा केल्या आहेत.

Advertisement

T 20 विश्वचषकात इतर कोणत्याही जोडीने इतक्या धावा केल्या नाहीत. यासोबतच बाबर पहिल्याच टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. या विश्वचषकात बाबरने आतापर्यंत सहा सामन्यांत 303 धावा केल्या आहेत. त्याच्या आधी ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने पहिल्या टी-२० विश्वचषकात २६५ धावा केल्या होत्या.

Advertisement
Advertisement

Leave a Reply