नवी दिल्ली : जगात आपला दबदबा निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनच्या कारवाया काही केल्या थांबण्यास तयार नाही. शेजारी असणाऱ्या देशांना तर चीन राजरोसपणे धमकावू लागला आहे. त्यामुळे या देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक हितांना मोठा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकी रक्षा विभागाचे मुख्यालय असणाऱ्या पेंटागनने हा धक्कादायक खुलासा केला आहे.
चीनच्या या कारवायांमुळे हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता प्रस्थापित होणार नाही. चीनची धोरणे या विरोधात आहेत. शेजारी देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक हितांना धोका निर्माण होईल, असा प्रयत्न चीन सातत्याने करत आहे. असे प्रकार म्हणजे या देशांना घाबरवणे किंवा त्यांना धमकावण्यासारखे आहे, असे मिडीया सचिव जॉन किर्बी यांनी म्हटले आहे.
सध्या भारत आणि चीनमध्ये सुद्धा तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांदरम्यान सध्या जो वाद सुरू आहे, त्यावर अमेरिकाही सतर्क आहे. हा वाद आधिक गंभीर होणे योग्य नाही. त्यामुळे या मुद्द्यावर लवकरच भारतीय अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या तैवानच्या मुद्द्यावर अमेरिका आणि चीन दरम्यान वाद सुरू आहेत. अमेरिकेने तैवानला पूर्ण पाठिंबा दिला आहे. अमेरिकेच्या जोरावर आता तैवान थेट चीनला आव्हान देत आहे. त्यामुळे चीन चांगलाच भडकला आहे. या मुद्द्यावर चीनचे नेते अमेरिकेला धमकी देत आहेत. मात्र, अमेरिकेने याकडे साफ दुर्लक्ष करत तैवानला समर्थन देणे सुरुच ठेवले आहे. अमेरिकेचे पाठबळ असल्याने चीनलाही तैवान विरोधात आक्रमक धोरण घेताना विचार करावा लागत आहे. चीनने काहीही निर्णय घेतला तरी त्याचे जागतिक राजकारणात पडसाद उमटणार आहेत.
चीनची दंडेली सुरूच : भारताच्या एका शेजारी देशातील काही भागावर केला कब्जा.. काय आहे प्रकार..
.. म्हणून चीनने अमेरिकेला पुन्हा दिलीय धमकी; पहा, कोणत्या प्रकाराने चीनचा होतोय तिळपापड..?